Advertisement

मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सानिका ठरली सर्वोत्तम


मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सानिका ठरली सर्वोत्तम
SHARES

मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत एखाद्या मुलीने चमक दाखवली, हे अपवादानंच पाहायला मिळतं. पण दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन अायोजित अायडीबीअाय फेडरल इन्श्युरन्स कप (१२ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत बाॅइज क्रिकेट क्लबकडून खेळणाऱ्या सानिका चाखले हिने ९३ धावा अाणि सहा विकेट्स मिळवत अापली छाप पाडली अाणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावला.


एमअायजी स्पोर्टस क्लबला जेतेपद

अार्य राऊत अाणि हृदय मेहता यांच्या दमदार फलंदाजीला प्रणव ताथानी याने गोलंदाजीत दिलेली साथ यामुळे एमअायजी स्पोर्टस क्लबने बाॅइज क्रिकेट क्लबचा ८६ धावांनी पाडाव करत विजेतेपदावर नाव कोरले. अायडीबीअायचा तुषार सिंग (१८७ धावा) सर्वोत्तम फलंदाज ठरला तर प्रणव ताथानी सर्वोत्तम गोलंदाज (१३ विकेट्स) अाणि अायडीबीअायच्या गावित जेन याला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून गौरवण्यात अालं. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, ब्राझीलचा माजी फुटबाॅलपटू बरेटो यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात अालं.



अार्य राऊतचे अर्धशतक

एमअायजी संघाने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकांत ३ बाद १४५ धावा केल्या. अार्य राऊतने ६ चौकारांसह ५१ धावांची खेळी साकारली. त्याला हृदय मेहतानं ४० धावा फटकावत चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. हे लक्ष्य गाठताना बाॅइज सीसी संघाचा डाव १९.५ षटकांत ५९ धावांत अाटोपला. प्रणव ताथानी अाणि नेस मलेसरा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवल्या. अार्य राऊतला सामनावीराचा पुरस्कार देण्यात अाला.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा