Advertisement

एसअायडब्ल्यूएसचा सलामीच्या सामन्यात दमदार विजय


एसअायडब्ल्यूएसचा सलामीच्या सामन्यात दमदार विजय
SHARES

वडाळ्याच्या साऊथ इंडियन वेल्फेअर सोसायटी काॅलेजने (एसअायडब्ल्यूएस) अाठव्या साकिब रिझवी स्मृती अांतर-महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत गोरेगावच्या लाॅर्डस यूनिव्हर्सल काॅलेजवर १०३ धावांनी दमदार विजय साकारला.


माटुंगा येथील न्यू हिंद मैदानावर झालेल्या सलामीच्या सामन्यात एसअायडब्ल्यूएसने प्रथम फलंदाजी करताना १७३ धावा उभारल्या. त्यात अष्टपैलू खेळाडू अंकितने ५६ धावांची सर्वाधिक खेळी केली. या अाव्हानाचा पाठलाग करताना लाॅर्डस काॅलेजचा डाव अवघ्या ७० धावांवर अाटोपला. मध्यमगती गोलंदाज फैझान खान याने फक्त २७ धावा देत पाच विकेट्स मिळवत एसअायडब्ल्यूएसच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. श्रीराज याने तीन तर अनिकेत याने २ विकेट्स मिळवले.


एमसीएचे कार्यकारी समितीचे सदस्य अरमान मलिक अाणि रिझवी एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका अॅड. रुबिना अख्तर हसन रिझवी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात अाले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा