Advertisement

उत्साह 'अॅन्थुसिया' क्रीडा इव्हेंटचा


उत्साह 'अॅन्थुसिया' क्रीडा इव्हेंटचा
SHARES

माटुंगा - वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट अँड इंजिनियरिंग कॉलेज जिमखानातर्फे 'अॅन्थुसिया' 'सायक्लोथॉन' या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 11 डिसेंबरला सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत हा क्रीडा महोत्सव पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांनी सहभाग घेतला. एकूण 200 जणांनी सहभाग घेत महोत्सवाला सहकार्य केलं. वीजेटीआय महाविद्यालयापासून ते किंग्ज सर्कल, माटुंगा, वडाळा, दादर टीटी या सर्व ठिकाणांवरून सायकल स्वारी करत हा 'सायक्लोथॉन' पार पाडला. हा इंट्रा महाविद्यालयीन इव्हेंट असून मोठ्या संख्येनं नागरिकांनी प्रतिसाद दिला असं 'अॅन्थुसिया' क्रीडा इव्हेंटचे सरचिटणीस 'जोएल डीसोझा' यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा