Advertisement

Bigg Boss 14 : जाणून घ्या कोण आहेत जान कुमार सानू?

बिग बॉस १४ या शोमध्ये जान कुमार सानू हे स्पर्धक असणार आहेत अशी घोषणा केली गेली आहे.

Bigg Boss 14 : जाणून घ्या कोण आहेत जान कुमार सानू?
SHARES

3 ऑक्टोबरपासून बिग बॉस १४ सुरू होणार आहे. मागील वर्षाप्रमाणेच या कार्यक्रमात कोण भाग घेणार आहे आणि नवीन ट्विस्ट काय असतील याबाबत बरीच उत्सुक्ता आहे. शोची थीम “अब पलटेगा सीन क्युंकी २०२० को मिलेगा जवाब” असं आहे.

शोमध्ये नवीन ट्विस्ट काय असतील या संदर्भात बरीच चर्चा चालू आहे. या शोमध्ये काय वेगळं आहे हे जाणून घेण्यासाठी अद्याप काही वेळ शिल्लक आहे. तथापि, शोमध्ये जान कुमार सानू हे स्पर्धक असणार आहेत अशी घोषणा केली गेली आहे.

जान कुमार सानू सुप्रसिद्ध गायक कुमार सानूचा धाकटा मुलगा आहे. त्यांना दोन मोठे भाऊ आहेत. अनेकांना माहित नाही परंतु जानचं खरं नाव जयेश भट्टाचार्य आहे. त्यांच्या वडिलांप्रमाणेच जानलादेखील गायक व्हायचं आहे. त्यांच्याकडे एक YouTube चॅनेल आहे. ज्यावर ते अनेक लोकप्रिय गाणी गातात. अकेले हम, दिल मेरा चुराया क्यू अशा त्यांच्या वडिलांच्या काही गाण्यांचं कव्हरही त्यांनी केलं आहे.

जान यांना लहानपणापासूनच गायक होण्याची इच्छा होती. तारे जमीन पर या चित्रपटाच्या बम बम बोले या गाण्यासाठी जान यांनी आवाज दिला आहे. जान केवळ गायकच नाही तर हार्मोनियम, तबला, पियानो आणि गिटार सारखी वाद्ये वाजवू शकतात.

आपल्या मुलानं हा नवीन प्रवास सुरू केल्याबद्दल कुमार सानूसुद्धा खूप उत्सुक दिसत आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत मुलाला शुभेच्छा दिल्या आहेत. कुमार सानू यांनीही आपल्या चाहत्यांना मुलाला आशीर्वाद देण्याचं आवाहन केलं आहे.

कुमार सानू यांनी म्हटलं आहे की, “मला आज खूप आनंद झाला आहे कारण माझा मुलगा जान बिग बॉसमध्ये जात आहे. त्याला माझ्या सर्व शुभेच्छा, प्रार्थना आणि आशीर्वाद आहे. आपणा सर्वांनीही त्याच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तो ज्या खेळासाठी जात आहे तो जिंकू शकेल .”



हेही वाचा

'बिग' डिसीजन! अमिताभ बच्चन करणार अवयवदान

आमीर खानच्या पाणी फाऊंडेशननं 'या' गावात उभारलं जंगल

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा