अमेरिकन रेसलर आणि WWE सुपरस्टार द अंडरटेकरनं रविवारी निवृत्ती घेण्याची घोषणा केली. अंडरटेकर रविवारी वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंट (WWE) सरवायवर सीरीज २०२० दरम्यान शेवटचा रिंगमध्ये दिसला. यावेळी त्यांनी आपल्या फेमस वॉकसह रिंगमध्ये एंट्री घेतली. २२ नोव्हेंबर १०९० ला डेब्यू करणाऱ्या अंडरटेकरनं २२ नोव्हेंबर २०२० ला WWE ला निरोप दिला.
"My time has come to let The @undertaker rest ... in ... peace." #SurvivorSeries #FarewellTaker #Undertaker30 pic.twitter.com/Mg9xr8GB94
— WWE (@WWE) November 23, 2020
WWE नं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे अंडरटेकरनं एक पोस्ट केली. यात लिहलं आहे की, रिंगमधील माझी वेळ संपली आहे. आता अंडरटेकरला निरोप द्या. यादरम्यान WWE लीजेंड द रॉक, जॉन सीना, ट्रिपल एच, शॉन मायकल्स, रिक फ्लेअर आणि केनसह अनेक सुपरस्टार उपस्थित होते. यावेळी सर्वांनी अंडरटेकरचे ३० वर्षांच्या करिअरसाठी आभार मानले.
अंडरटेकरनं २२ नोव्हेंबर १९९० ला सरवायवर सीरीजद्वारे WWE मध्ये पदार्पण केले होते. अंडरटेकरने ७ वेळा WWE चॅम्पियनशिप आपल्या नावे केली आहे. आगळ्या-वेगळ्या रिंग वॉकद्वारे अंडरटेकरला ओळख मिळाली होती. ५५ वर्षीय अंडरटेकरनं WWE मध्ये आपला अखेरचा सामना रेसलमेनिया ३६ मध्ये AJ स्टाइल्सविरोधात खेळला होता. या सामन्यात अंडरटेकरला विजय मिळाला होता.
हेही वाचा