Advertisement

पेशव्यांचा पराक्रम दाखवणारं 'अजिंक्य योद्धा’ महानाट्य लवकरच रंगभूमीवर!

श्रीमंत पेशवे बाजीराव...त्यांचं व्यक्तिमत्त्व, जीवन चरित्र व त्यांचा हा इतिहास आजच्या पिढीला समजावा या उद्देशाने संजय पांडे यांच्या संकल्पनेतून ‘अजिंक्य योद्धा’ - ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ हे महानाटय लवकरच रंगभूमीवर साकारले जाणार आहे.

पेशव्यांचा पराक्रम दाखवणारं 'अजिंक्य योद्धा’ महानाट्य लवकरच रंगभूमीवर!
SHARES

हिंदुस्थानातील निजाम, मोगल, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय महासत्तांना मात देणारा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणजेच ‘श्रीमंत पेशवे बाजीराव’. त्यांचं व्यक्तिमत्त्व, जीवन चरित्र व त्यांचा हा इतिहास आजच्या पिढीला समजावा या उद्देशाने संजय पांडे यांच्या संकल्पनेतून ‘अजिंक्य योद्धा’ - ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ हे महानाटय लवकरच रंगभूमीवर साकारले जाणार आहे.


‘पंजाब टॅाकीज निर्मित’ या महानाट्याची घोषणा व संगीत प्रकाशन सोहळा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोदजी तावडे यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात गाण्यांचं धमाकेदार सादरीकरण व ‘पेशवे बाजीराव बल्लाळ’ या महानाट्याची छोटेखानी झलक दाखवण्यात आली. वरुणा मदनलाल राणा दिग्दर्शित आणि प्रताप गंगावणे लिखित ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे हे ‘महानाट्य’ आहे. पेशव्यांची कारकीर्द, त्यांच्या मोहिमा आणि शेवट असा संपूर्ण जीवनपट या महानाट्यातून उलगडला जाणार आहे.



‘अजिंक्य योद्धा’ या महानाट्याचा पहिला प्रयोग १२ मेला शाहू विद्यालय पटांगण पुणे येथे होणार आहे. या महानाट्यात १३० हून अधिक कलावंत सहभागी झाले आहेत. ‘अजिंक्य योद्धा’ श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ या महानाटयासाठी सहाय्यक दिग्दर्शन व कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी अभय सोड्ये यांनी सांभाळली आहे. या महानाट्यातील गाणी गायक आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, नंदेश उमप, वैशाली माडे यांनी गायली आहेत.



हेही वाचा

आता स्पृहा म्हणणार नाही, 'डोन्ट वरी बी हॅपी'!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा