Advertisement

NMMTच्या ताफ्यात लवकरच 100 नव्या वातानुकूलित ई-बस येणार

परिवहनच्या ताफ्यात सध्या सर्व मिळून 541 बसगाड्या आहेत. मात्र वाढते शहर, शहरालगत होणारा विकास आणि त्यातून नवी मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.

NMMTच्या ताफ्यात लवकरच 100 नव्या वातानुकूलित ई-बस येणार
SHARES

नवी मुंबई (navi mumbai) महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात लवकरच नवीन 100 वातानुकूलित इलेक्ट्रिकल बसेस (electric buses) दाखल होणार आहेत. सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात 190 ई-बसेस आहेत. त्यामुळे आणखी 100 बसची भर पडल्यास एनएमएमटीच्या एकूण बसगाड्यांची संख्या 290 वर पोहोचणार आहे.

या बसगाड्या दाखल झाल्यास बऱ्याच मार्गावर बसगाड्यांच्या फेऱ्या वाढणार असून काही नवीन मार्गावरही बसेस सुरू करता येणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटीच्या (nmmt) बसेस नवी मुंबई महापालिका हद्दीसह नवी मुंबईलगतच्या ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, खारघर, कळंबोली, पनवेल, कर्जत- रसायनी, खोपोलीपर्यंत सेवा देतात. 

एनएमएमटीच्या दररोजची प्रवासीसंख्या सरासरी अडीज लाखांच्या घरात आहे. परिवहनच्या ताफ्यात सध्या सर्व मिळून 541 बसगाड्या आहेत. मात्र वाढते शहर, शहरालगत होणारा विकास आणि त्यातून नवी मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परिवहनच्या बसगाड्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. तसेच, अनेक बसगाड्या जुन्या झाल्यामुळे त्या भंगारातही काढल्या जातात.

या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने भविष्यातील गरज ओळखून मागील वर्षी 100 इलेक्ट्रिकल बसेस खरेदी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार बसेसचे उत्पादन करणाऱ्या कंपनीकडे मागणी देखील नोंदवली होती. त्यानुसार आत्ता या बसेसची बांधणी अंतिम टप्प्यात असून बसेस लवकरच तयार होऊन, परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे काही जुन्या प्रवासी-मार्गावर या बसेस चालवल्या जाणार आहेत. तर काही नवीन मार्ग सुरू करण्याचा विचार परिवहन करत आहे.

एनएमएमटीच्या ताफ्यातील एकूण बसगाड्यांची संख्या - 541

स्वमालकीच्या - 210

कंत्राटी तत्त्वावरील - 331

नवीन बसगाड्या आल्यावर होणारी बसगाड्यांची संख्या -  641



 हेही वाचा

दक्षिण मुंबईत वाहतूक निर्बंध लागू, 'हे' रस्ते बंद

मुंबई उच्च न्यायालयाने 2018 ची जनहित याचिका पुन्हा उघडली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा