Advertisement

Mumbai local: प्रवाशांसाठी ८८ टक्के लोकल पुन्हा रुळांवर

रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या गर्दीचं विभाजन करण्यासाठी लोकलच्या संख्येत वाढ केली आहे.

Mumbai local: प्रवाशांसाठी ८८ टक्के लोकल पुन्हा रुळांवर
SHARES

मुंबई लोकलनं (mumbai local) प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांचे रेल्वे प्रवासकडे लक्ष लागून राहिलं आहे. मात्र प्रवाशांच्या गर्दीचा प्रश्न उपस्थित होत असला तरी रेल्वे प्रशासनानं या गर्दीचं विभाजन करण्यासाठी लोकलच्या संख्येत वाढ केली आहे. त्यानुसार, मुंबई लोकलवरील २ हजार ७७३ लोकल अर्थात ८८ टक्के फेऱ्या सोमवारपासून पुन्हा रुळांवर येणार आहेत. १५ डब्यांच्या लोकलसह महिला विशेष आणि वातानुकूलित लोकलही सुरू झाल्या आहेत.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अनुक्रमे ५५२ आणि २०१ लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे मध्य आणि हार्बरवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या एक हजार ५७२ झाली आहे, तर पश्चिम रेल्वेवरील एकूण फेऱ्यांचा आकडा एक हजार २०१पर्यंत पोहचला आहे.

मुंबईची लाइफलाइन सर्वांसाठी खुली करण्याबाबत राज्य आणि रेल्वे यांच्यात अनेकदा चर्चा झाली. मात्र गर्दी नियंत्रणाचे उपायावर एकमत झाले नाही. यामुळे सर्वांसाठी लोकलप्रवासावर तूर्त बंदी कायम आहे. प्रवाशांच्या (passenger) मागणीनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलदेखील धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील सर्व वातानुकूलित लोकल आणि सर्व महिला विशेष लोकल सुरू झाल्या आहेत.

यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसह राज्य सरकारने परवानगी दिलेल्या प्रवाशांची मागणी पूर्ण झाली आहे. लोकलमधील गर्दी विभागण्यासाठी सर्वप्रथम कार्यालयीन वेळ बदलण्याची सकारात्मक चर्चा पार पडली. यापूर्वी लोकल गर्दीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उच्च न्यायालयानेदेखील कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत विचार करण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला होता. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा