Advertisement

‘एआय’ कॅमेऱ्यांची वाहनांवर नजर

या तंत्राचा वापर करून वाहनांचा वेग मोजण्यात येत आहे.

‘एआय’ कॅमेऱ्यांची वाहनांवर नजर
SHARES

मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’वर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम’ (आयटीएमएस) प्रणालीअंतर्गत 52 ठिकाणी दोन्ही बाजूने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

या तंत्राचा वापर करून वाहनांचा वेग मोजण्यात येत आहे. वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्यास कारवाई केली जात आहे. पूर्वी सीटबेल्ट नसल्यास प्रत्येक कॅमेऱ्याद्वारे कारवाईचा बडगा उगारला जात होता. मात्र, आता ‘एआय’ कॅमेऱ्याच्या माध्यमातून एकदाच सीटबेल्टची कारवाई होणार आहे.

‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’वर ‘आयटीएमएस’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत 52 ठिकाणी दोन्ही बाजूंनी ‘एआय’ आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या प्रणालीअंतर्गत बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे सीटबेल्ट परिधान न करणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे, लेनची शिस्त न पाळणे आदी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांना ई-चलन देण्यात येत आहे.

सर्व वाहनधारकांनी वाहतूक करताना सर्व नियमांचे पालन करावे व वेग मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी,’ असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.



हेही वाचा

मुंबईत 2 वर्षात उभारण्यात येणार बर्ड पार्क

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा