मुलुंड: रविवार म्हणजे मेघा ब्लॉक, हे समीकरणच ठरलंय! याची मुंबईकरांना आता सवयच झाली आहे. रविवारी सकाळ पासूनच मुलुंडपासून माटुंगापर्यंत जाणारा स्लो ट्रॅक बंद होता. त्यात सकाळी 11.30 ची खोपोली-सीएसटी या लोकलची अनाउन्समेंट झाली, की स्लो ट्रॅक बंद असल्याकारणाने फास्ट ट्रेन भांडुप तसेच विक्रोळी या अतिरिक्त स्थानकांवर देखील थांबवण्यात येईल. परंतु ती लोकल थेट घाटकोपरलाच थांबली. या अनाउन्समेंटमुळे भांडुप तसेच विक्रोळीचे सर्व प्रवासी थेट घाटकोपरला उतरले. रेल्वे प्रशासनाच्या गोंधळामुळे प्रवाशांची नाहक तारांबळ उडाली. रविवारी दिवसभर हा सावळा गोंधळ सुरूच होता.