वांद्रे आणि खार हे मुंबईतील सर्वात गजबजलेल्या उपनगरांपैकी एक मानले जातात. या भागात राहणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा अधिकच त्रास सहन करावा लागतोय. अरुंद रस्ते आणि त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी, वाहतूक विभागानं एक योजना आखली आहे. याअंतर्गत सम-विषम पार्किंग व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
राज टिळक रौशन, डीसीपी वाहतूक (मुख्यालय आणि मध्य), यांनी एक अधिसूचना जारी केली ज्यामध्ये १३ रस्त्यांवर नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे.
नवीन प्रणालीनुसार, तारीख सम झाल्यावर रस्त्याच्या पूर्वेला पार्किंगला परवानगी दिली जाईल. दुसरीकडे, तारीख विषम असताना रस्त्याच्या पश्चिमेला पार्किंगला परवानगी दिली जाईल.
याशिवाय चार रस्ते एकेरी करण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीट चालावी यासाठी ही योजना आखली आहे. या व्यतिरिक्त, माउंट मेरी रोड इथं नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले आहेत, असंही नमूद करण्यात आलं आहे.
माहितीनुसार, हे माउंट मेरी चर्च ते केन रोडच्या जंक्शनपर्यंत केलं जाईल, असं वाहतूक विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे.
६ मार्चपासून संपूर्ण मुंबईतील नो-पार्किंग भागात पार्क केलेली वाहने एक आठवडा वाहतूक पोलिस टोइंग करणार नाहीत, असं मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटलं आहे. प्रायोगिक तत्त्वावर हे करण्यात आल्याचंही ते म्हणाले.हेही वाचा