बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराचा वाद आता अणखीनचं चिघळत चालला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी वेतन करारासह अन्य मागण्यांसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, आता 'बेस्ट कामगार सेनेनं बेस्ट प्रशासनाशी केलेला वेतन करार ज्या कामगारांना मान्य नाही त्यांना यंदा बोनस देऊ नये', असं परिपत्रक बेस्ट प्रशासनानं काढलं आहे. परंतु, हे परिपत्रक जुलामी असल्याचा आरोप बेस्ट वर्कस युनियननं केला आहे. तसंच, बेस्ट वर्कस युनियननं या परिपत्रका विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत बेस्ट प्रशासनासोबत झालेला करार बेस्ट वर्कर्स युनियनला अमान्य आहे. त्यामुळं कामगार सेनेच्या सदस्यांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांनी या करारावर सह्या केलेल्या नाहीत. यामुळं 'ज्यांना वेतन करार मान्य नाही त्यांना बोनस देऊ नये', असं परिपत्रक प्रशासनानं काढलं आहे. त्यामुळं आता बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बेस्टच्या कामगारांचा वेतनाबाबतचा सामंजस्य करार बेस्ट समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. हा करार शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेनं केला आहे. मात्र, या कराराविरोधात आता बेस्टमध्ये बेस्ट कामगार सेनेच्या विरोधात इतर संघटना एकवटल्या आहेत.
नुकताचं, बेस्ट प्रशासनानं ९००१ रुपये बोनस जाहीर केला आहे. मात्र ज्यांनी करारावर सह्या केलेल्या नाहीत त्यांना बोनस मिळू नये, असं परिपत्रक सर्व अधिकाऱ्यांना पाठवले आहे. दरम्यान, बोनस हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा अधिकार असून ज्यांना करार मान्य नाही त्यांनाही तो मिळाला पाहिजे, अशी भूमिका बेस्ट वर्कर्स युनियननं घेतली आहे.
हेही वाचा -
चिल्लर हवी आहे, या बस आगारात; बेस्टची नवी क्लपना
विधानसभा निवडणुकीमुळं पहिल्या सत्रातील परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम