बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी ८ जानेवारीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. संपाचा निर्णय घेण्यासाठी कामगार संघटनांनी गुरुवारी मतदान घेतले होते. शुक्रवारी त्याची मतमोजणी झाली. यामध्ये ९५ टक्के म्हणजे १४ हजार ४६१ कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूनं मतदान केलं अाहे. एकूण १५ हजार २११ कर्मचाऱ्यांनी मतदान केलं होतं.
बेस्टचा 'क' अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या 'अ' अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, २००७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची ७,९३० रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती करण्यात यावी, एप्रिल १६ पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करावी, २०१६-१७ आणि १७-१८ साठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस आणि कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा, अनुकंपा भरती सुरू करावी अशा मागण्या बेस्ट वर्कर्स युनियनने केलेल्या आहेत.
हेही वाचा -
प. रेल्वेवरील अपघातांना बसणार आळा, रुळांत बसवली 'एटीईएस' यंत्रणा
सांताक्रूझचा पादचारी पूल ३१ डिसेंबरपासून प्रवाशांसाठी खुला