बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने 'प्रीमियम बस सेवा' आधारित अॅप लाँच केले. प्रीमियम बस सेवेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि दररोज सरासरी 5000 हून अधिक प्रवासी या सेवेचा वापर करत आहेत, असे बेस्टने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
बुधवार, 5 एप्रिल 2023 पासून, बेस्टने ठाणे ते अंधेरी पूर्व आणि गुंदवली मेट्रो स्टेशन ते बीकेसी अशा दोन नवीन बस मार्गांवर प्रिमियम बस सेवा सुरू केली आहे. दोन्ही मार्गांवर, 15 मिनिटांच्या वारंवारतेवर प्रीमियम बसेस गर्दीच्या वेळेत, म्हणजे सकाळी 7:30 ते 11:30 आणि दुपारी 4:00 ते रात्री 8:00 पर्यंत उपलब्ध असतील.
"विमानतळ मार्गांच्या मागणीत झालेली वाढ लक्षात घेऊन, दक्षिण मुंबई ते विमानतळ आणि खारघर ते विमानतळ यांसाठी प्रीमियम बस सेवा सध्याच्या 45 मिनिटांऐवजी 30 मिनिटांच्या वारंवारतेवर उपलब्ध असेल," बेस्टने सांगितले.
त्यात म्हटले आहे की, ज्या प्रवाशांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे, ते 'बेस्ट चलो अॅप'वर प्रीमियम बसचा लाइव्ह ट्रॅक करू शकतील आणि अॅपवर उपलब्ध असलेल्या ट्रिपच्या वेळा आणि तपशीलानुसार या बसेस बुक करू शकतील.
या बसमध्ये आरामदायी आसनांसह मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगची सुविधाही आहे. विमानतळ सेवेतील सामानासाठी कोणतेही शुल्क न आकारता प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष बॅगेज रॅक बसवण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेल्या प्रीमियम बसेसची संख्या 50 आहे, असे बेस्टने सांगितले.
हेही वाचा