मुंबई - ऐन दिवाळीतच राज्य वीज नियामक आयोगानं मुंबईतल्या बेस्टच्या वीज ग्राहकांना दर कपातीची भेट दिलीय. बेस्टचे वीज दर ७ टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश वीज नियामक आयोगानं दिलाय. ही नवीन वीज दररचना ऑक्टोबर महिन्यापासूनच लागू होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रति युनिट ४ रुपये १३ पैशांऐवजी ३ रुपये ९२ पैसे द्यावे लागतील.आधीच आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला मात्र यामुळे मोठा फटका बसणार आहे. परिवहन विभागाच्या तुटीची वसूली करण्यासाठी वीज ग्राहकांकडून वसूल केलेल्या टीडीएलआरचे ३ हजार १९५ कोटीही बेस्टला ग्राहकांना परत करावे लागणार आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत हे परतावे दिले जाणार नाहीत. एकंदरीत १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या सर्वच निवासी वीज ग्राहकांसाठी ही दिवाळीची भेटच ठरली आहे.