Advertisement

मुंबई मॅरेथाॅनसाठी बेस्टच्या मार्गात बदल


मुंबई मॅरेथाॅनसाठी बेस्टच्या मार्गात बदल
SHARES

रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथाॅनसाठी बेस्ट प्रशासनाने बेस्ट बसगाड्यांच्या मार्गात मोठे बदल केले आहेत. त्यानुसार रविवारी २१ जानेवारीला सकाळी ६ ते दुपारी १ पर्यंत काही बस मार्ग बंद राहणार आहेत. तर काही बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.


'असे' आहेत बदल

बस क्रमांक ९९, १०५, १०६, १०८, ११२, १२३, १३२, १३३, १३७, १३८, १५५ आणि दादर फेरी-२ हे बेस्ट बस मार्ग तात्पुरते अर्थात दुपारी १ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तर, मंत्रालय, मेयो रोड, चर्चगेट स्थानक (पूर्व), बाबुलनाथ, वाळकेश्वर, कमला नेहरू पार्क, वरळी डेअरी, वरळी गाव आणि ग्रँट रोड स्थानक (पश्चिम) या बस चौक्याही रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. दुपारी १ नंतर बेस्ट बस मार्गासह बस चौक्या सुरू राहणार असल्याचं बेस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

बेस्ट बसगाड्या बंद ठेवण्याबरोबरच काही बस गाड्यांचे मार्ग तात्पुरते वळवण्यात आले आहेत.



वळवण्यात आलेले बस मार्ग

भेंडी बाजार, महात्मा फुले मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून शामा प्रसाद मुखर्जी चौक, कुलाबा, आर. सी चर्च, नेव्हीनगरकडे जाणारा मार्ग सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाडी बंदर, पी. डिमेलो रोड आणि शहीद भगत सिंग मार्ग असा बदलण्यात आला आहे.

तर, पंडित पलुस्कर चौक येथून प्र. ठाकरे चौक आणि माहिमकडे जाणारा बस मार्ग नाना चौक, वसंतराव नाई चौक, वत्सलाबाई देसाई चौक, महालक्ष्मी रेसकोर्स, ई. मोझेस मार्ग, आचार्य अत्रे चौक, जीएम भोसले मार्ग, काॅ. पी. के. कुरणे चौक, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग आणि गोखले रोड मार्ग असा वळवण्यात आला आहे.

त्यामुळे रविवारी घरातून बाहेर पडताना बेस्ट प्रवाशांनी या बदलांची माहिती घ्यावी आणि मगच प्रवास करावा, असं आवाहन बेस्टकडून करण्यात आलं आहे.



हेही वाचा-

रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथाॅनची समग्र माहिती हवीय? मग हे वाचा

मुंबई मॅरेथाॅन पूर्ण करणाऱ्याला मिळणार 'इन्स्पिरेशन मेडल'


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा