बेस्ट कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी वडाळा आगारात बेमुदत उपोषण सुरू केलं असून, मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा इशारा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं दिला होता. परंतु, हे बेमुदत उपोषण गुरूवारी अखेर काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं आहे. गौरी-गणपतीनंतर पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी हे उपोषण मागे घेण्यासाठी केलेल्या आव्हानाला कामगारांकडून प्रतिसाद देण्यात आला आहे.
गुरूवारी या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस होता. ३ दिवस सलग उपोषणाला बसल्यानं कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळं त्यांना त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याबाबत माहिती मिळाताच खासदार नारायण राणे यांनी उपोषणस्थळी जाऊन कामगारांची चौकशी करत 'सणवारांच्या दिवसात उपोशषण करणं योग्य ठरणार नाही, यामुळं सामान्य जनतेचे हाल होतील. तुम्ही हव तर तुमच्या मागण्यांसाठी गौरी-गणपतीनंतर पुन्हा उपोषण सुरू करा, तेव्हा तुमच्या बरोबर मी देखील असेल', असे आश्वासन दिलं.
नारायण राणे यांनी केलेल्या या विनंतीचा मान ठेवत कामगारांनी उपोषण तूर्तास स्थगित केलं आहे. त्यावेळी राणेंनी शिवसेनेवर टीकास्र सोडत, शिवसेनेनेच बेस्ट डबघाईला आणलं असल्याचा आरोप केला. दरम्यान, तर्तास उपोषण स्थगित झालं असलं तरी, या दिवसांत बेस्टनं तोडगा न काढल्यास कामगार पुन्हा संपावर जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
उपोषणाला बसलेले शशांक राव यांची प्रकृती बिघडली, केईएममध्ये दाखल