Advertisement

रुळांवर चाकांचं घर्षण थांबविण्यासाठी मध्य रेल्वेनं आणली 'ही' नवी यंत्रणा

लोकल बिघाड थांबविण्यासाठी मध्य रेल्वेनं नवीन ‘चाक वंगण यंत्रणा’ आणली आहे.

रुळांवर चाकांचं घर्षण थांबविण्यासाठी मध्य रेल्वेनं आणली 'ही' नवी यंत्रणा
SHARES

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल या हार्बर आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांना अनेकदा तांत्रिक बिघाडाच्या समस्यांना तोंड द्याव लागतं. रेल्वे रुळाला तडा जाणं, ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होणं, सिग्नल यंत्रणेत बिघाड होणं यांसारख्य अनेक अडचणींमुळं प्रवाशांचा खोळंबा होतो. त्याचप्रमाणं या ट्रान्स हार्बर मार्गावर असलेल्या वळणांमुळं लोकलच्या चाकांचं घर्षण होतं. त्यामुळं लोकलमध्ये बिघाड निर्माण होतात. त्यामुळं हे बिघाड थांबविण्यासाठी मध्य रेल्वेनं नवीन ‘चाक वंगण यंत्रणा’ आणली आहे.

रुळांवर घर्षण

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल, ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावर वळणं आहेत. या वळणांमुळं लोकलचं रुळांवर सातत्यानं घर्षण होतं. अशा ठिकाणी वेगमर्यादाही निश्चित केल्या आहेत. तरीही चाकांचं घर्षण होऊन त्यांची झीज होते व लोकल जागीच थांबणं, रुळांवरून घसरणं यांसारखे प्रकार घडतात.

हेही वाचा - लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांमध्ये 'याची' प्रचंड वाढ


प्रवाशांची गैरसोय

असे प्रकार घडल्यानंतर लोकल दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये नेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळं प्रवाशांचीही गैरसोय होते. दरम्यान, लोकल दुरूस्तीसाठी नेल्यानंतर दुरुस्तीसाठी १ ते २ दिवस लागत असल्यानं त्याचा वेळापत्रकावर मोठा परिणाम होऊन हार्बरवासीयांचे हाल होतात. त्यामुळं आता यावर तोडगा काढण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.

हेही वाचा - मुंबई उपनगरीय लोकलला ‘एशियन बँके’कडून ५० कोटी डाॅलरची मदत


विशिष्ट प्रकारचं वंगण

चाक वंगण यंत्रणेत चाकांना विशिष्ट प्रकारचं वंगण लावून त्यांची रुळांवरून धावताना घर्षण होणार नाही वा त्यांची झीज होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. लोकल गाड्यांच्या खालच्या भागांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येत आहे. लोकल सुरू होताच चाकांमधून वंगण निघेल व आपोआप ते अन्य चाकांनाही मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली.



हेही वाचा -

राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक, सत्ता स्थापनेचा पेच सुटणार?

'या' मार्गावर धावणार नवी एसटी बस



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा