Advertisement

मध्य रेल्वेचं यात्री अॅप लाँच, प्रवाशांना होणार ‘हा’ फायदा

मध्य रेल्वेनं एक मोबाईल अॅप्लिकेशन, यात्री अॅप लाँच केलं आहे.

मध्य रेल्वेचं यात्री अॅप लाँच, प्रवाशांना होणार ‘हा’ फायदा
SHARES

मध्य रेल्वेनं एक मोबाईल अॅप्लिकेशन, यात्री अॅप लाँच केलं आहे. याद्वारे मुंबईच्या लोकल गाड्यांविषयी थेट आणि वेळेवर माहिती मिळेल. आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी हे अॅप डाउनलोड केलं आहे.

गाड्यांचे वेळापत्रक या अॅपवर जाहीर तर केलं जाईलच. याशिवाय तांत्रिक विलंब, बिघाड इत्यादी घोषणा अॅपवर दिल्या जातील. सीआरच्या एका वरिष्ठ पीआरओनं सांगितलं की, प्रवाशांना आता एका क्लिकवर माहिती मिळेल. येत्या काही दिवसांमध्ये अचूक स्थानकांची माहिती देण्यासाठी सेवा सुधारल्या जातील.

याशिवाय त्याची टप्प्याटप्प्यानं चाचणी म्हणून बेलापूर, नेरल आणि खारकोपर इथून सुरुवात केली जाईल. निकालांचे विश्लेषण केल्यानंतर ते सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध केले जाईल.

हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात ट्रेन, ई-कार्ट बुकिंग इत्यादींची माहिती प्रदान करेल. तसंच, एखादी व्यक्ती त्यांच्या आवडत्या गाड्या आणि मार्ग त्याबद्दल नियमित अपडेट मिळवण्यासाठी चिन्हांकित करू शकते. अस्सल माहिती आणि अद्यतनांशिवाय, वेळापत्रक, सुविधा, धोरणे इत्यादी बरीच अतिरिक्त वैशिष्ट्ये पुढे जोडली जातील.



हेही वाचा

एअर इंडियावर पुन्हा टाटा समूहाची मालकी? केंद्रानं फेटाळलं वृत्त

कारवाईपासून वाचण्यासाठी कार चालकानं वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेलं

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा