खडवली स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाउन दोन्ही दिशेच्या गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिरानं धावत आहेत. गुरुवारी सकाळच्या सुमारास रुळाला तडे गेल्यानं चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.
रेल्वे रुळाला तडे गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसंच, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीनं दखल घेण्यात आली असून, दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
बुधवारी देखील डोंबिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली होती. तसंच, मध्य रेल्वेच्या गाड्या २० ते २५ मिनिटं उशीरानं धावत होत्या. कल्याण, डोंबिवलीहून दररोज सीएसएमटीच्या दिशेनं हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, लोकल उशिरानं सुरू असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हेही वाचा -
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ११.१४ कोटींचा दंड वसूल, मध्य रेल्वेची कारवाई
अंधेरीत २३ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार