कल्याणजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्यानं शुक्रवारी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. कर्जत-कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत असून, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
तांत्रिक बिघाडासाठी आणि अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मध्य रेल्वेवर कार्यालयीन वेळेतच वाहतुकीचे तीनतेरा वाजलेत. रुळाला तडा गेल्यानं जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्याचा नेहमीचा उपाय मध्य रेल्वेनं केला आहे, पण त्यामुळे वेळापत्रकाचा पार बोजवारा उडाला आहे.