गर्दीमुळं जीव गमावलेल्या एका व्यक्तीच्या आई-वडिलांना 8 लाख रुपे नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर, कोर्टाने रेल्वेचा दावादेखील फेटाळला आहे.
8 मे 2010 रोजी गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनमधून एक प्रवासी खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात कोर्टाने प्रवाशांच्या आई-वडिलांना 4-4 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नासिक अहमद खानकडे वडाळे ते सँडहर्स्ट रोड-चिंचपोकळीपर्यंतचा मासिक पास होता. तो नेहमी याच मार्गे प्रवास करायचा.
2010मध्ये या तरूण सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास तो घरातून निघाला. लोकलला त्यादिवशी खूप गर्दी होती. त्यातच नासिर ट्रेनमधून खाली कोसळला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. प्रवाशांनी त्याला जेजे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रेल्वे न्यायधिकरणाने नासिरच्या आई-वडिलांचा दावा फेटाळून लावला होता.
न्यायधिकरणाने एक प्रश्न उपस्थित केला होता, नासिर खरंच प्रवासी होता का आणि रेल्वे कायद्यानुसार ही घटना 'अयोग्य घटना' म्हणून पात्र आहे का, नासिरच्या अपघातानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल न देणे आणि जप्त केलेले रेल्वे तिकीट न मिळाल्याबद्दल न्यायाधिकरणाने शंका व्यक्त केली होती.
हेही वाचा