Advertisement

फुकटात एसी किंवा फर्स्ट क्लासने प्रवास करणं पडणार महागात

एसी/फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणारे प्रवासी आता तिकीट नसलेल्या प्रवाशांच्या तक्रारी व्हॉट्सॲप करू शकतात.

फुकटात एसी किंवा फर्स्ट क्लासने प्रवास करणं पडणार महागात
SHARES

भारतीय रेल्वेमधून (indian railway) दररोज जवळपास लाखो लोक प्रवास करतात. त्यामध्ये अनेजकण स्लीपर अथवा जनरल क्लासमधून प्रवास करतात. आता मुंबईत (mumbai) तर लोकल (mumbai local) ही लाईफलाईन असल्याचं म्हटलं जातं. मात्र, ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांमध्ये अनेकदा भांडणे झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत.

यासंदर्भातील अनेक भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. अनेकवेळा ट्रेनमध्ये जागेवरून भांडणं होतात. तसेच अनेकदा काहीजण तिकीट न काढताही प्रवास करताना आढळून येतात. यानंतर अशा प्रकारच्या तक्रारी रेल्वे प्रशासनापर्यंत जातात.

अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण वाढल्यामुळे आता मध्य रेल्वेने (central railway) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने प्रवास करत असताना एखाद्या प्रवाशाला काही अडचण असेल किंवा त्याची काही तक्रार असेल तर थेट व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करता येणार आहे. मध्य रेल्वेने आता व्हॉट्सॲप हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. यासंदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.

या व्हॉट्सॲप हेल्पलाईन सेवेमुळे आता फक्त वैध तिकीट असलेले प्रवासीच एसी आणि फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करतील. याची खात्री करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने सांगितली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.



हेही वाचा

एसटीचा विस्तार होणार!

भाजप निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रावसाहेब दानवे

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा