Advertisement

वाहतूकदारांच्या संपाला चौथ्या दिवशी हिंसक वळण

सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये उभ्या असलेल्या १२ ट्रक अाणि ट्रेलरच्या काचा फोडत या वाहनांचं नुकसान केलं. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे.

वाहतूकदारांच्या संपाला चौथ्या दिवशी हिंसक वळण
SHARES

इंधनदरवाढीने हैराण झालेल्या खाजगी मालवाहतूकदारांनी देशव्यापी संप पुकारून ३ दिवस झाले तरी, केंद्र सरकारने या संपाची दखल न घेतल्याने अखेर या संपाला हिंसक वळण लागलं आहे. यामुळेच संपाच्या चौथ्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी संपात सहभागी न झालेल्या १२ वाहनांची नवी मुंबईतील तळोजा इथं तोडफोड केली.


कधी घडली घटना?

सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये उभ्या असलेल्या १२ ट्रक अाणि ट्रेलरच्या काचा फोडत या वाहनांचं नुकसान केलं. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे.


कधीपासून संप?

आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (एआयएमटीसी)ने डिझेलचे दर 'जीएसटी'च्या कक्षेत आणण्याच्या मागणीसाठी २० जुलैपासून अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. या संपाला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.


संपाकडे दुर्लक्ष

केंद्र सरकारने वाहतूकदारांच्या समस्या समजावून घ्याव्यात, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. परंतु संपाच्या चौथ्या दिवशीही अद्याप सरकारकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. देशभरातील ९३ लाख ट्रक या संपात सहभागी झाल्याचा संघटनेचा दावा आहे.


मुख्य मागण्या काय?

डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणण्यासोबतच टोल वसुली प्रक्रियेत सुधारणा करण्यात यावी, ही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. टोल वसुली व्यवस्थेतील त्रुटींमुळे वर्षाला १.५ लाख कोटी रुपयांचं इंधन वाया जात असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. अप्रत्यक्ष करांमध्ये कपात करणे, बस आणि ट्रकला राष्ट्रीय परवाना मिळणे तसंच सामान थेट बंदरांपर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था बंद करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.



हेही वाचा-

वाहतुकदारांच्या संपाला मुंबईत संमिश्र प्रतिसाद

शुक्रवारपासून वाहतुकदारांचा बेमुदत संप



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा