Advertisement

अंध आणि दिव्यांग रेल्वे प्रवाशांसाठी यात्री अॅपमध्ये नवी सुविधा

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांच्या हस्ते यात्री अ‍ॅपमधील लोकलचे ट्रॅकिंग सुविधेचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले.

अंध आणि दिव्यांग रेल्वे प्रवाशांसाठी यात्री अॅपमध्ये नवी सुविधा
SHARES

अंध आणि दिव्यांग रेल्वे प्रवाशांना यात्री मोबाइल अ‍ॅपचा वापर करणे सुलभ व्हावे, यासाठी गुगल 'व्हॉइस कमांड'चा समावेश पश्चिम रेल्वेवरील यात्री अ‍ॅपमध्ये करण्यात आला आहे. यामुळे 'ओके गुगल' म्हणत चर्चगेट-विरार जलद लोकल अंधेरी स्थानकात वेळेत येणार आहे की नाही, याची माहिती ऐकण्यास मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांच्या हस्ते यात्री अ‍ॅपमधील लोकलचे ट्रॅकिंग सुविधेचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले.

असा होणार फायदा...

  • पश्चिम रेल्वेवरील सर्व लोकलमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

  • जीपीएसच्या मदतीने लोकलची सद्यस्थिती प्रवाशांना मोबाइलद्वारे उपलब्ध होईल.
  • शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा असलेल्या लोकलसह मेट्रो वन / २अ / सात, मोनो, बेस्ट, आणि फेरी बोट यांची माहिती देणारे अॅप म्हणून यात्री अॅप विकसित करण्यात आले आहे.

  • नियमित लोकलसाठी अलार्म लावण्याची सुविधा उपलब्ध आहे.

  • सर्व स्थानकात उपलब्ध असलेल्या सुविधा एका क्लिकवर पाहता येणार असल्याने प्रवाशांना अॅपची मोठी मदत होणार आहे.
  • रेल्वे स्थानकाचे नकाशे तसेच तिकिटांचे दरही उपलब्ध असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा अॅपच्या वापरातून मिळत आहे.
  • रेल्वे दंड, मेट्रो दंड यांची कलमांसह माहिती उपलब्ध आहे.
  • लोकलसह मेट्रो, मोनोच्या वेळापत्रकाचा समावेश अॅपमध्ये आहे.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेने 'या' एक्स्प्रेसना डहाणू रोडवर अतिरिक्त थांबा जाहीर केला

बेस्टची दोन नवीन मार्गांवर प्रीमियम बस सेवा सुरू, वाचा सविस्तर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा