सध्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व विमान सेवा बंद आहेत. त्यामुळे कोणत्याही एअरलाईन्सचे विमान उड्डाण घेत नाही. मात्र या एअरलाईन्स ट्विटरच्या माध्यमातून एकामेकांची थट्टामस्करी करत आहेत. सोबतच या कठीण परिस्थितीमध्ये घरातच राहणे उत्तम असल्याचा संदेश देत आहेत. लॉकडाऊनच्या स्थितीत या एअरलाईन्सनी ट्विटरवर एकमेकांशी साधलेला संवाद सध्या लोकांचे मन जिंकत आहे.
देशातील सर्वात मोठी खाजगी एअरलाईन्स इंडिगोनं सर्वात प्रथम एअर विस्ताराला टॅग करत ट्विट केलं की, हेय एअर विस्तारा, असं ऐकलं की सध्या उंच उड्डाण घेत नाही? सोबतच पार्किंगमध्येच सुरक्षित राहण्याचा देखील सल्ला दिला.
Hey @airvistara , not #flyinghigher these days we heard? #StayingParkedStayingSafe #LetsIndiGo
— IndiGo (@IndiGo6E) April 10, 2020
इंडिगोच्या या ट्विटनंतर सर्वच एअरलाईन्स या संवादामध्ये उतरल्या. इंडिगोला उत्तर देत एअर विस्तारानं ट्विट केलं की, नाही इंडिगो, सध्या जमिनीवर राहणेच चांगले आहे. उड्डाण घेणं नक्कीच चांगला पर्याय नाही. काय गो एअरलाईन?
No 😌 @IndiGo6E, these days being on-ground is a wonderful thing. Flying would not be the ‘smart’ choice, what say @goairlinesindia? #StayingParkedStayingSafe
— Vistara (@airvistara) April 10, 2020
गो एअरलाईननं देखील याला होकार देत लिहिलं की, नक्कीच, एअरविस्तारा. घरी राहणं हेच सुरक्षित आहे. जोपर्यंत लोकं विमान प्रवास सुरू करत नाहीत, तोपर्यंत आपण वाट पाहू शकतो. कारण सध्या लोकं उड्डाण घेऊ शकत नाही, बरोबर ना एअरएशिया इंडिया?
No 😌 @IndiGo6E, these days being on-ground is a wonderful thing. Flying would not be the ‘smart’ choice, what say @goairlinesindia? #StayingParkedStayingSafe
— Vistara (@airvistara) April 10, 2020
यावर उत्तर देताना एअरएशिया इंडियानं लिहिलं की, नक्कीच. सध्या घरी राहणेच सर्वात योग्य आणि चांगली गोष्ट आहे. सोबत फ्लाय स्पाइस जेटला देखील टॅग केलं.
Totally, @airvistara! Staying home is the safe feeling! We can hardly wait till everyone takes to the skies, coz at the moment it's not like #NowEveryoneCanFly right, @AirAsiaIndian? #StayingParkedStayingSafe
— GoAir (@goairlinesindia) April 10, 2020
स्पाइसजेटनं उत्तर दिलं की, एअर एशिया, हे समजल्यावर चांगलं वाटलं की, आपले विचार आपल्या रंगांप्रमाणेच जुळतात. चांगल्या भविष्यासाठी आपण सर्व आनंदी आहोत. बरोबर ना दिल्ली एअरपोर्ट? यावर दिल्ली विमानतळानं देखील त्यांच्या म्हण्याला होकार दिला.
Absolutely @goairlinesindia, for now though, staying at home is the Red. Hot. Spicy thing to do! Isn't that right @flyspicejet?! #StayingParkedStayingSafe
— AirAsia India (@AirAsiaIndian) April 10, 2020
यानंतर इंडिगोनं संवाद संपवत लिहिलं की, तुम्ही आमच्यासोबत आहात, हेच आम्हाला मजबूत बनवते. लॉकडाऊनच्या काळातील सर्व एअरलाईन्सचा ट्विटर संवाद नेटकऱ्यांना देखील भलताच आवडला.
हेही वाचा