स्पर्धेच्या या युगात आपला धंदा टिकवण्यासाठी 'मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने' काळी पिवळी टॅक्सीचे 'आमची ड्राईव्ह' हे अॅप नुकतेच प्रवाशांच्या सेवेत आणले. पण या अॅपला मुंबईकरांकडून मात्र अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पण या अॅपच्या माध्यमातून टॅक्सी बुकिंग करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दक्षिण मुंबईतून अधिक आहे. गेल्या चार दिवसांत 20 हजार मुंबईकरांनी 'आमची ड्राईव्ह' अॅप डाउनलोड केला आहे. चार दिवसांत फक्त चार हजार प्रवाशांनी आतापर्यंत काळी पिवळी टॅक्सी बुक करून प्रवास केला आहे.
गेले कित्येक दशके मुंबईकरांना सेवा पुरवणाऱ्या काळी पिवळी टॅक्सीची आता स्मार्ट टॅक्सी म्हणून ओळख झाली असली तरी, ओला उबेरच्या तुलनेत काळी पिवळी अद्याप मागेच असल्याचे दिसून येते.
बंगळुरू स्थित सन टेलिमॅटिक्स या कंपनीने तयार केलेल्या 'आमची ड्राईव्ह' अॅप्स मुंबईकर प्रवाशांप्रमाणे काळी पिवळी टॅक्सी चालकांच्या पसंतीस उतरला असल्याचा दावा टॅक्सी युनियनने केला आहे. दररोज 50 ते 60 टॅक्सीचालक या अॅपची नोंदणी करण्यासाठी पुढे येत आहेत. अॅपद्वारे सर्वांत जास्त टॅक्सी बुकिंग दक्षिण मुंबईत होत आहे. त्यामुळे काही महिन्यांत 10 हजार काळी पिवळी टॅक्सीचे अॅपमध्ये नोंदणी करणार असल्याचे टॅक्सी -
- एल.के. क्वॉड्रोस, अध्यक्ष टॅक्सी युनियन संघटना
खासगी टॅक्सी असलेल्या ओला उबेरला स्पर्धा देण्यासाठी आणि मुंबईकरांना उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या अॅपला मुंबईकरांनी अल्प प्रतिसाद दिला आहे. या अॅप्लिकेशनला 3.8 इतके रेटिंग देण्यात आले आहे.
1 जुलै रोजी टेलिकॉम कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना या अॅपद्वारे संदेश पाठवता आला नाही. त्यामुळे रेटिंग 2 टक्क्यांनी कमी झाले. इतर टॅक्सी कंपनीच्या तुलनेत 'आमची ड्राइव्ह'ला 3.8 रेटिंग मुंबईकरांनी देऊन या अॅप्सला पसंती दिली आहे. दादर, सीएसटी, मुंबई सेंट्रल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात टॅक्सी बुकिंग होत आहेट
- बी. विलास, मुख्य कार्यकारी अधिकारी, सन टेली मॅटिक्स कंपनी
हे देखील वाचा -
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीच्या ऑनलाईन सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)