दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाच्यानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कोकण रेल्वेकडून यंदा गणेशोत्सवादरम्यान वांद्रे आणि मुंबई सेंट्रल या स्थानकातून विषेश गाड्या सोडण्यात येतील.
यंदा १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने या उत्सवासाठी १२ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई ते मंगळुरू, कणकवली, सावंतवाडी, रत्नागिरी, पेडणे तसंच कर्नाटकच्या दरम्यान धावतील. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकण आणि कर्नाटकात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय होणार आहे. या विशेष गाड्यांचं आरक्षण विशेष शुल्कासह सर्व पीआरएस केंद्र आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर करता येईल.
थांबे - बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, मदुरे, थिवीम, मडगाव जं., कारवार, कुमटा, भटकळ, मोकांबिका रोड, बायंदुर, कुंदापुरा, उडुपी, मुलकी आणि सुरतकल
थांबे - बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे, थिवीम, मडगाव जं., कारवार, कुमटा, भटकळ, मोकांबिका रोड, बायंदुर, कुंदापुरा, उडुपी, मुलकी आणि सुरतकल
थांबे - बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे, थिवीम, मडगाव जं., कारवार, कुमटा, भटकळ, मोकांबिका रोड, बायंदुर, कुंदापुरा, उडुपी, मुलकी आणि सुरतकल
गाडी क्रमांक - ०९००७
कधी - ६, ८, १०, १३, १५, १७, २० आणि २२ सप्टेंबर
वेळ - रात्री ११.५० वाजता
कधी पोहचणार - दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता
गाडी क्रमांक - ०९००८
कधी - ७, ९, ११, १४, १६, १८, २१ आणि २३ सप्टेंबर
वेळ - दुपारी ४.३० वाजता
कधी पोहचणार - दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०५ वाजता
थांबे - बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे
हेही वाचा -
खूशखबर! गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या