Advertisement

४९६ किमी वेगाने धावणार हायपरलूप, मुंबई-पुणे प्रकल्प होणार २ टप्प्यांत पूर्ण

मुंबई (बीकेसी) ते पुणे (वाकड) दरम्यान ११७.५० किमीचा हा हायपरलूप प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हे अंतर २३ मिनिटांत पार करण्यासाठी प्रति तास ४९६ किमी एवढी गती प्रस्तावित करण्यात आली आहे.

४९६ किमी वेगाने धावणार हायपरलूप, मुंबई-पुणे प्रकल्प होणार २ टप्प्यांत पूर्ण
SHARES

रेल्वे, रस्ते मार्गापेक्षाही जलद तसंच मुंबईहून (Mumbai) पुण्याला (Pune) अवघ्या २३ मिनिटांत पोहोचवणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाकडे मुंबई आणि पुण्यातील तमाम प्रवाशांचं लक्ष लागून राहिलं आहे. हा प्रकल्प कधी आकारास येईल याची उत्सुकता ताणलेली असताना राज्य सरकारने (State government) येत्या दोन ते अडीच वर्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होईल, तर संपूर्ण प्रकल्प ६ ते ८ वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पाला (Mumbai-Pune ultra-fast hyperloop transport project) पायाभूत प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. 

प्रकल्प व्यवहार्यता अहवाल

मुंबई-पुणे ही दोन महत्त्वाची शहरं आणखी जवळ आणण्यासाठी राज्य सरकारनं अत्याधुनिक हायपरलूप प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या (Pune Metropolitan Regional Development Authority) खांद्यावर टाकण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकार आणि अमेरिकेच्या व्हर्जिन कंपनीमध्ये करार झाला आहे. हा करार झाल्यानंतर 'पीएमआरडीए'ने एका कंपनीकडून या प्रकल्पाचा पूर्व व्यहार्यता अभ्यास अहवाल तयार करून घेतला आहे. हा प्रकल्प व्यवहार्यता अभ्यास अहवाल मुंबई आयआयटीने (Indian Institute of Technology Bombay) तपासल्यावर ‘पीएमआरडीए’ने 'डेव्हलपमेंट परफाॅर्मन्स रिपोर्ट' (डीपीआर) तयार करण्याचं काम हाती घेतलं. ज्यात हा मार्ग नेमका किती किमीचा असेल, तो कसा आणि कुठून जाईल, त्यासाठी किती खर्च येईल, त्यासाठी किती वेळ लागले या सर्व बाबी अंतिम करण्यात आल्या.  

११७.५० किमीचा मार्ग

त्यानुसार मुंबई (बीकेसी) ते पुणे (वाकड) दरम्यान ११७.५० किमीचा हा हायपरलूप प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हे अंतर २३ मिनिटांत पार करण्यासाठी प्रति तास ४९६ किमी एवढी गती प्रस्तावित करण्यात आली आहे.

७० हजार कोटी रुपयांची एफडीआय

या प्रकल्पाचं काम एकूण २ टप्प्यांत होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण परिसरात प्रयोगिक तत्वावर ११. ८० किमीचा मार्ग तयार करण्यात येईल. पुढील २ ते अडीच वर्षांत हा प्रकल्प राबवण्यात येईल. यासाठी एकूण ५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित मुंबई ते पुणे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल. या प्रकल्पात एकूण ७० हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक होणार आहे.  

सोबतच मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोष‍ित करण्यास तसंच (World-Virgin Hyperloop consortium) डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीस, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोष‍ित करण्यास मान्यता देण्यात आली.



हेही वाचा- 

Exclusive: पुण्यावरून थेट बीकेसीत १४ मिनिटांत, हायपरलूपचं शेवटचं स्थानक बीकेसी?

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पाला 'गती'



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा