Advertisement

मुंबई विमानतळ ते पुणे मार्गावर धावणार शिवनेरी?

एसटी महामंडळ या मार्गावर बोरिवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ अशी वातानुकूलित सेवा देण्याचा विचार करत आहे.

मुंबई विमानतळ ते पुणे मार्गावर धावणार शिवनेरी?
SHARES

मुंबई विमानतळाहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या प्रवाशांना आता मुंबई विमानतळ ते पुणे हा प्रवास एसटी महामंडळाच्या बसमधून करता येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळ या मार्गावर बोरिवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ अशी वातानुकूलित सेवा देण्याचा विचार करत आहे. त्याचप्रमाणं, या सेवेसाठी एसटी महामंडळाची मुंबई विमानतळ प्राधिकरणाशी चर्चाही सुरू आहे.

खासगी टॅक्सी

विमानानं मुंबईत येणाऱ्या आणि येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना खासगी टॅक्सीशिवाय पर्याय नसतो. तसंच, पुण्याला जाण्यासाठी तत्काळ कोणतीही पर्यायी सेवा उपलब्ध नसते. त्यामुळं प्रवाशांना खासगी टॅक्सीचा आधार घ्यावा लागतो. खासगी टॅक्सीवाले त्यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारतात. अशा प्रवाशांना एसटीकडं आकर्षित करण्यासाठी मुंबईतून पुण्याला जाणाऱ्या वातानुकूलित एसटी सेवा मुंबई विमानतळाशी जोडण्याचा विचार करण्यात येत आहे. मुंबई सेन्ट्रल, परळ, कुर्ला येथूनही पुण्यासाठी गाड्या सुटतात. त्यांचीही जोडणी राष्ट्रीय मुंबई विमानतळाला देण्यात येऊ शकते का, याची चाचपणी सध्या केली जात आहे.

हेही वाचा - बीएमसी शाळांमधील मुलांमध्ये पोषणाचा अभाव


विमानतळाबाहेर बससेवा

बंगळूरुच्या धर्तीवर मुंबई विमानतळाबाहेर बससेवा देण्याचा एसटीचा प्रयत्न आहे. बंगळूरु विमानतळाबाहेर तेथील महानगर वाहतूक महामंडळानं ‘वायु वज्रा’ नावानं वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. विमानांच्या वेळापत्रकाप्रमाणं या बस सेवा विमानतळाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना तत्काळ उपलब्ध होतात. त्यामुळं खासगी टॅक्सींपेक्षा या बसगाड्यांनाच अधिक प्राधान्य विमान प्रवासी देतात.


पार्किंगच्या जागेसाठी चर्चा

मुंबई विमानतळ प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा केली जात असून, मुंबई राष्ट्रीय विमानतळाबाहेर एसटी गाड्या उभ्या करण्यासाठी जागा देण्यावरून चर्चा करण्यात आली. नेमक्या कोणत्या वेळेत एसटीची वातानुकूलित सेवा मुंबई विमानतळाबाहेर असावी याचा अभ्यास केला जात आहे. त्यानुसार, एसटीची सेवा दिली जाणार आहे.

हेही वाचा - ‘असं’ आहे मुंबईच्या पोटातून धावणाऱ्या मेट्रोचं रुप


वातानुकूलित सेवा

बोरिवलीतून पुण्यासाठी वातानुकूलित शिवनेरीच्या १२ फेऱ्या होतात. यातील काही फेऱ्या विमानतळाला जोडण्याचा विचार केला जात आहे. तसंच, मुंबई विमानतळाबाहेर पडणारे प्रवासी पुण्याव्यतिरिक्त राज्यातील अन्य कोणत्या शहरात जातात, त्यानुसारही आणखी एसटीची वातानुकूलित सेवा देण्याचाही पर्याय शोधला जात आहे.



हेही वाचा - 

महिला प्रवाशांसाठी ‘तेजस्विनी’ लवकरच धावणार

लोकलवर फेकलेल्या वस्तूमुळं प्रवासी जखमी



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा