Advertisement

मुंबई लोकल प्रवासासाठी आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

मुंबई लोकल प्रवासासाठी आंदोलन
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, लोकल बंद असल्यामुळं नागरिकांच्या महिन्याच्या आर्थिक खर्चात मोठी वाढ झाली आहे. शिवाय पेट्रोल व डिझेलचेही दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं आर्थिक समस्या आणखी वाढत आहेत. त्यामुळं कोरोना लसीकरण झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, या मुख्य मागणीसाठी मुंबई रेल प्रवासी संघातर्फे शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मंत्रालय इथं आंदोलन करण्यात येणार आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर आंतरराज्य प्रवास, पर्यटन स्थळी फिरण्याची मुभा आहे. लस घेतल्यानंतर विदेशी प्रवासाला देखील परवानगी मिळते. असे असताना केवळ मुंबई लोकललाच हा नियम लागू का केला जात नाही, हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांचे दौरे, सभा, उद्घाटन कार्यक्रम प्रचंड गर्दीत सुरू आहे. दुसरीकडे सामान्य मुंबईकर, नोकरदार आणि श्रमिक वर्गाच्या लोकल प्रवासावर बंदी घातली आहे.

लसीकरण झालेल्या नागरिकांना प्रवासाची मुभा मिळावी, क्यूआर कोड यंत्रणा सर्व रेल्वे स्थानकावर कार्यान्वित करावी, स्थानकात आणि बाहेर गर्दी टाळण्यासाठी मेट्रो धर्तीवर यंत्रणा उभी करावी, स्थानकाबाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी आणि रेल्वे स्थानक आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची असल्याने त्यानुसार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई रेल प्रवासी संघातर्फे करण्यात आली आहे.




हेही वाचा -

पुरेशा लस साठ्याअभावी शुक्रवारी अनेक ठिकाणी लसीकरण बंद

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा