Advertisement

आता 3 दिवस आधी अनारक्षित तिकिट बुक करू शकता

पण यासाठी किलोमीटरची अट असणार आहे...

आता 3 दिवस आधी अनारक्षित तिकिट बुक करू शकता
SHARES

प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने 200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या उपनगरीय विभागांसाठी 3 दिवस आधी (प्रवासाचा दिवस वगळता) अनारक्षित तिकिट बुक करण्याची सुविधा सुरू केली आहे.

या उपक्रमाचे उद्दिष्ट तिकीट प्रक्रिया सुलभ करणे आणि बुकिंग काउंटरवरील गर्दी कमी करणे आहे. विशेषतः गर्दी आणि सणासुदी दरम्यान ही सुविधा फायदेशीर ठरेल.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, ही तरतूद सर्व अनारक्षित तिकिटिंग सिस्टम (यूटीएस) काउंटरवर उपलब्ध आहे.

तिकीट खिडक्यांवरील लांब रांगा कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना सहज प्रवास अनुभव देण्यासाठी, विशेषतः होळी, दिवाळी, उन्हाळी आणि हिवाळी सुट्ट्या, ख्रिसमस या सणांमध्ये हे फायदेशीर ठरेल. 

पश्चिम रेल्वेने नोंदवले आहे की, बऱ्याच प्रवाशांना याबाबत माहिती नाही. जागरूकता वाढवण्यासाठी आणि अधिक प्रवाशांना त्याचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

 विनीत यांनी यावर भर दिला की, हा उपक्रम लांब पल्ल्याच्या प्रवास करणाऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. कारण यामुळे त्यांना त्यांच्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करता येईल आणि बुकिंग काउंटरवर शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळता येईल.

रेल्वे अधिकारी प्रवाशांना तणावमुक्त आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी या आगाऊ बुकिंग पर्यायाचा वापर करण्याचे आवाहन करतात.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेची प्रवाशांवर दंडात्मक कारवाई

बीकेसी-कुलाबा मेट्रोचा '2 अ' चा टप्पा मार्चअखेर खुला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा