Advertisement

लघुशंकेसाठी शुल्क आकारणी सुरूच, रेल्वे प्रवासी नाराज


लघुशंकेसाठी शुल्क आकारणी सुरूच, रेल्वे प्रवासी नाराज
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसह मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या सर्व स्थानकांवरील प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी सध्या एक रुपया आकारणी होत आहे. या शुल्क आकारणीला विरोध दर्शवण्यासाठी रेल्वे प्रवासी आणि राजकीय पक्षांनी गुरूवारी आंदोलन केले. तरीही प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी रेल्वे प्रशासनाने शुल्क आकारण्याचे धोरण सुरूच ठेवल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


वाद कायम 

लघुशंकेसाठी शुल्क आकारणीविरोधात सीएसटीएमसह चर्चगेट रेल्वे स्थानकावर काही संतप्त प्रवाशांनी गुरुवारी आंदोलन केले. दुपारी १२.३० च्या सुमारास प्रवाशांनी केलेल्या आंदोलनामुळे या रेल्वे स्थानकावर काही काळ तणाव पसरला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत प्रवाशांची समजूत काढली. प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी शुल्क आकारले जात असल्याची समजूत काढल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले. 


जेथे शुल्क, तेथेच स्वच्छता 

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या काही स्थानकावरील प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी सशुल्क आणि विनाशुल्क असे प्रकार आहेत. एक रुपया आकारण्यात येणाऱ्या प्रसाधनगृहात कंत्राटदारांकडून स्वच्छता राखली जाते. तर विनाशुल्क प्रसाधनगृहात स्वच्छतेचा अभाव आढळतो. त्याचप्रमाणे महिलांसाठी असणाऱ्या प्रसाधनगृहात स्वच्छतेसाठी शुल्क आकारले जाते. पण आतापर्यंत पुरुष प्रवाशांच्या प्रसाधनगृहातील बहुतेक ठिकाणी लघुशंकेसाठी शुल्क आकारले जात नाही.


कधीकधी कंत्राटदरांकडून जादा पैसे देखील आकारले जातात. रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने या सुविधा दिल्या. मग शुल्क आकारण्याचे कारण काय? जर स्वच्छतेसाठी शुल्क आकारण्यात येत असेल तर ठिक आहे. पण अनेक स्थानकांवरील प्रसाधनगृहात प्रवाशांकडून पैसे आकारले गेल्यानंतरही तेथील परिस्थिती खूप वाईट असते. तिकिटावर प्रवाशांकडून ०.५ टक्के स्वच्छतेच्या नावावर कर आकरण्यात येतो. रेल्वे प्रशासनाने याबाबतीत काहीतरी तोडगा काढावा.
- शैलेश राऊत, प्रवासी मित्र


हेही वाचा 

रेल्वे स्थानकांच्या अतिक्रमणांवर महापालिकेची नजर

रेल्वे स्थानकांवरील 'वन रुपी क्लिनिक' सुरुच राहणार


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा