पश्चिम रेल्वेमार्गावरील एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे.
कारण,
तिसरी एसी लोकल मुंबईत दाखल झाली असून, लवकरचं या लोकलला चालण्यात येणार आहे. परंतु,
सध्या दुसऱ्या एसी लोकलची चाचणी सुरू आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या एसी लोकलची निर्मिती भेल कंपनीद्वारे करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणं तिसऱ्या एसी लोकलची निर्मिती देखील भेल कंपनीद्वारे करण्यात आली आहे.
मुंबईत उकाडा प्रचंड वाढल्यानं एप्रिल महिन्यात एसी लोकलनं तब्बल ४.४७ लाख प्रवाशांनी प्रवास केला.
यामधून पश्चिम रेल्वेला १.८४ कोटींची कमाई झाली आहे.
मागील वर्षातील मे महिन्यात एसी लोकलची १.६८ कोटींची कमाई झाली होती,
तर ऑक्टोबर महिन्यात १.८२ कोटींची कमाई झाली होती.
एसी लोकलला सुरूवातीच्या काळात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, काही काळानंतर प्रवाशांचा एसी लोकलला मिळणार वाढता प्रतिसाद पाहता पश्चिम रेल्वेनं एसी लोकलच्या आणखी सेवा सुरू करण्याच्या योजना आखल्या आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावर दुसरी एसी लोकल दाखल झाल्यावर शनिवार आणि रविवारी देखील एसी लोकल चालवण्याची शक्याता आहे. तसंच, भविष्यात पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या सोमवार ते शुक्रवार १२ फेऱ्या होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा -
सचिन घरोटे ठरला 'स्वातंत्र्यवीर दौड २०१९'चा विजेता