Advertisement

मुंबई ते शिर्डीचा प्रवास फक्त 40 मिनिटांत


मुंबई ते शिर्डीचा प्रवास फक्त 40 मिनिटांत
SHARES

मुंबईहून शिर्डीतल्या साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण आता हा प्रवास फक्त 40 मिनिटांत करता येणार आहे. मुंबई ते शिर्डी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. रविवारी 1 ऑक्टबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या शिर्डी विमानतळाचे लोकार्पण केले. त्यानंतर कोविंद यांनी साई शतकोत्तर महोत्सवाचे देखील उद्घाटन केले.

मागील काही दिवसांपासून मुंबई ते शिर्डी या विमानसेवेची चाचणी सुरू होती. ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर मुंबईतल्या भाविकांना फक्त 40 मिनिटात शिर्डी गाठता येणार आहे.


दरदिवशी 6 विमानांचे उड्डाण

शिर्डीसाठी रोज 6 विमाने उड्डाण घेतील. मुंबईसह, दिल्ली, हैदराबाद आणि भोपाल येथील भक्त देखील विमानाने शिर्डीला जाऊ शकतील. सध्या शिर्डी विमातळावर रोज फक्त सहा विमानांच्या उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांची संख्या पाहून या विमान उड्डाणांची संख्या वाढवली जाऊ शकते.


हेही वाचा - 

शिर्डीचा प्रवास करा विमानाने


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा