मागील २० वर्षांपासून रखडलेल्या नेरुळ ते उरण रेल्वे मार्गातील पहिला टप्पा असलेल्या नेरुळ ते खारकोपर सेवा सोमवारपासून सुरू झाली. रविवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान, सोमवारपासून नेरुळ-खारकोपर आणि खारकोपर-बेलापूर मार्गावर रेल्वे फेऱ्या सुरू झाल्या. त्यामुळे या मार्गवारील प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.
नेरुळ ते उरण रेल्वे मार्गावर सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी आणि उरण ही रेल्वे स्थानके आहेत. या मार्गावरील नेरुळ ते खारकोपरपर्यंत रेल्वे धावणार आहे. तसंच पहिल्या टप्प्यात नेरुळ ते खारकोपर आणि खारकोपर ते बेलापूर स्थानकादरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.