मुंबई वाहतूक पोलिस अाता वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना ई-चलन पाठवून त्यांच्याकडून दंड वसूल करत अाहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांवरही वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी ई- चलन पाठवून १३ हजार रुपयांचा दंड अाकारण्यात अाला अाहे. मात्र, अद्याप हा दंड भरण्यात अाला नसल्याचं उघडकीस अालं अाहे.
वेगात गाडी चालवून वेगमर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात अाली अाहे. दंड वसूल करण्यासाठी ई -चलनही पाठवण्यात अालं अाहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकारातून ही माहिती उघडकीस अाणली अाहे. शकील अहमद शेख यांनी व्हीअायपी व्यक्तींच्या वाहनांच्या क्रमांकाद्वारे वाहतूक पोलिसांच्या एमटीपी अॅप्समधून त्यांना अाकारण्यात अालेल्या दंडाची माहिती घेतली.
शकील अहमद शेख यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी ते मे २०१८ या कालावधीत बांद्रा-वरळी सी लिंकवर वेगात गाडी चालवल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या एमएच -०१-सीपी -००३७ अाणि एमएच -०१-सीपी -००३८ या वाहनांवर दंड अाकारण्यात अाला. ही दंडाची रक्कम १३ हजार रुपये असून अद्याप ती भरलेली नाही.
हेही वाचा -
मेट्रो मार्गिका ठरवताना स्थानिकांशी चर्चा का नाही? न्यायालयाचा 'एमएमआरडीए'ला सवाल
'यूजीसी'चा 'तो' निर्णय रद्द करा' - आदित्य ठाकरे