Advertisement

आता खासगी बसमधूनही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी

खासगी प्रवासी वाहतुकीदरम्यान कोव्हिड १९च्या नियमांचं पालन सुद्धा करावं लागणार आहे.

आता खासगी बसमधूनही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी
SHARES

मिशन बिगीन अगेन (mission begin again) अंतर्गत राज्यातील अनेक सेवा आता सुरू केल्या जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या सेवेमुळं चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले होते. परंतु, आता हळुहळू वाहतूक सेवा सुरू होत असल्याना प्रवाशांना दिलासा मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एसटीतून १०० टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. अशातच आता खासगी वाहतुकदारांना (private transport) सुद्धा १०० टक्के प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

खासगी वाहतुकदारांना एसटी प्रमाणेच ५० टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी होती. त्यानंतर आता परवानगी मिळाल्यानं अनेक प्रवाशांसह खासगी वाहतुकीच्या चालक-मालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासगी प्रवासी वाहतुकीदरम्यान कोव्हिड १९च्या नियमांचं पालन सुद्धा करावं लागणार आहे.

राज्य सरकारनं एसटीला १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर खासगी वाहतुकदारांनी ही १०० टक्के प्रवासी वाहतूक करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात परिवहन आयुक्तांनी राज्य शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर आता खासगी वाहतुकीलाही १०० टक्के प्रवासी वाहतूक करता येणार असल्याचं समजतं.

'या' नियमांचं पालन करावं लागणार 

  • बसच्या प्रत्येक फेरीअंती बसची स्वच्छता ठेवणं.
  • निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे.
  • मास्क घातला नसेल तर प्रवाशाला बसमध्ये प्रवेश देऊ नये. 
  • बसच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवणे. 
  • बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी अतिरिक्त मास्क ठेवावा.



हेही वाचा -

मुंबई लोकलबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सुचना

धारावी पॅटर्नचं आता जागतिक बँकेकडून कौतुक


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा