Advertisement

बेस्टच्या भाडेतत्त्वाच्या बस चालकांना विमा कवच द्या; संघर्ष कामगार कर्मचारी युनियनची महापालिकेकडं मागणी

बेस्टच्या ताफ्यात भाडेत्त्वावरील मिनी बस गाड्यांवरील चालकांना ५० लाख रुपये विमा कवचाचे संरक्षण नसून, कोरोना भत्ताही मिळत नाही.

बेस्टच्या भाडेतत्त्वाच्या बस चालकांना विमा कवच द्या; संघर्ष कामगार कर्मचारी युनियनची महापालिकेकडं मागणी
SHARES

बेस्टच्या ताफ्यात १ हजारपेक्षा जास्त भाडेतत्त्वावरील बसगाड्या आहेत. मात्र, बेस्टच्या ताफ्यात भाडेत्त्वावरील मिनी बस गाड्यांवरील चालकांना ५० लाख रुपये विमा कवचाचे संरक्षण नसून, कोरोना (coronavirus) भत्ताही मिळत नाही. त्यामुळं त्यांना विमा कवच व भत्ता द्यावा, अशी मागणी संघर्ष कामगार कर्मचारी युनियननं मुंबई महापालिकेकडं केली आहे.

या बसचा चालक पुरवठादार कंपनीचा आणि वाहक बेस्टचा असतो. निश्चित केलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन देणं, नियमित वेतन न मिळणं, जास्त काम यामुळं भाडेतत्त्वाच्या बसवरील चालकांनी याआधी आंदोलनही केले होते. बेस्टने हा प्रश्न सोडविण्याच्या सूचना भाडेतत्त्वावर बस उपलब्ध करणाऱ्या कंपनीला केली.

परंतु हा प्रश्न रेंगाळला असतानाच या चालकांना कोरोनाकाळात कोरोना भत्ता व विमा कवचही मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. कोरोनाकाळात जनतेला सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडून ३०० रुपये कोरोना भत्ता आणि ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले.

परंतु, भाडेतत्त्वावरील बसवर कार्यरत असलेल्या चालकांसह देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या सर्व कामगारांना तो नियम लागू झालेला नाही. त्यामुळं मार्च २०२० पासूनचा भत्ता सर्व कर्मचाऱ्यांना मिळावा, तसंच कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येईपर्यंत कर्मचाऱ्यांना कोरोना भत्ता सुरू ठेवावा, अशी मागणी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी केली आहे.

कोरोनाकाळात कार्यरत असलेल्या बेस्टच्या चालक, वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांनाही अद्याप ३०० रुपये कोरोना भत्ता मिळालेला नाही. जून २०२० पर्यंतच भत्ता मिळाला. त्यानंतरही कोरोनाच्या पहिल्या लाटेत काम केल्यानं डिसेंबपर्यंतचा भत्ता मिळावा, अशी मागणी बेस्टमधील अनेक संघटनांकडून करण्यात आली आहे.



हेही वाचा -

फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामला भारतात बंदी?

'पी ३०५' दुर्घटनेतील 'इतक्या' मृतदेहांची ओळख पटवण्यात यश


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा