मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता लवकर होणार आहे. कारण मुंबई-नाशिक मार्गावर धावणाऱ्या राज्यराणी आणि पंचवटी एक्स्प्रेस ही पूश-पूल पद्धतीनं मार्गस्थ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. यासाठी चाचणी घेण्यात येणार असून, ही चाचणी यशस्वी झाल्यास मुंबई-नाशिक हा रेल्वे प्रवास अवघ्या अडीच तासांत पूर्ण होणार आहे. तसंच प्रवाशांचा प्रवासही जलद होण्यास मदत होणार आहे.
मुंबई-नाशिक असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढील आहे. त्यामुळं या मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असून अनेकांची गैर सोय होते. त्यामुळं प्रवाशांच्या सोईसाठी या मार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या दृष्टानं रेल्वेनं राज्यराणी आणि पंचवटी एक्स्प्रेस ही पूश-पूल पद्धतीनं मार्गस्थ करण्याचा निर्णय घेतला.
राज्यराणी आणि पंचवटीच्या बँकर काढून पूश-पूश तंत्रज्ञानासाठी चाचपणी करण्यात येणार आहे. प्रथम बँकरचा खर्च आणि पूश-पूल तंत्रज्ञानाचा खर्च यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. संबंधित मार्गासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर, राज्यराणी आणि पंचवटी एक्स्प्रेस पूश-पूल पद्धतीनं मार्गस्थ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते.
मुंबई-नाशिक हे अंतर पार करण्यासाठी पंचवटी एक्स्प्रेसला ३ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. तर राज्यराणी एक्स्प्रेसला हे अंतर पार करण्यासाठी ३.३० तासांपेक्ष जास्त वेळ लागतो. पंचवटी एक्स्प्रेसची लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.पूश-पूलनं राज्यराणी, पंचवटी मार्गस्थ केल्यास मुंबई, नाशिकसह मनमाड येथील प्रवाशांना देखील जलद आणि वेगवान प्रवास करता येणार आहे.
हेही वाचा -
क्रॉफर्ड मार्केट परिसरातील इमारतीचा भाग कोसळला