रेल्वे प्रवाशांची तिकीट खिडक्यांसमोरील मोठ-मोठ्या रांगेतून सुटका व्हावी, यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकांत ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन (एटीव्हीएम) आणि मोबाइल तिकीट वेंडिंग मशीन बसविण्यात आली आहेत. मात्र, दादर स्थानकातील काही मशीन बंदावस्थेत असून काही मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे प्रवाशांना लांबलचक रांग लावून तिकीट काढावं लागत अाहे.
दादर रेल्वे स्थानकातून दररोज लाखोच्या संख्येन प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्यामुळं तिकीटीच्या लांब रांगेत उभं राहून तिकीट काढण्यापेक्षा एटीव्हीएम मशीन आणि मोबाईल तिकीट वेंडिंग मशीन या सुविधांचा वापर करतात. मात्र, एटीव्हीएम मशीन आणि मोबाइल तिकीट वेंडिंग मशीनमधील काही मशीनमध्ये सतत बिघाड होत आहे. स्क्रिन टच, कागद अडकणे, तिकीट बाहेर पडताना अडचणी येणे यांसारख्या अनेक अडचणी प्रवाशांना येत आहेत.
दादर पश्चिम स्थानकात एकूण १५ एटीव्हीएम आहेत. यामधील ज्या मशीनमध्ये बिघाड होत आहे, त्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. काही एटीव्हीएम मशीनमध्ये सव्र्हरचा वेग कमी असल्यामुळे तिकीट काढताना अडथळा येतो, अशी माहिती दादर स्थानकातील स्टेशन मास्तर यांनी दिली.
मोबाइल तिकीट वेंडिंग मशीनमध्ये वारंवार बिघाड होतो. तिकीट काढताना कागद अडकणे, मोबाईल मशीनशी संलग्न न होणे, सव्र्हरचा वेग कमी असणे अशा समस्या वारंवार येत असतात.
- धवल कोठारी, प्रवासी
दादर पश्चिम स्थानकात असलेल्या एटीव्हीएम मशीनमध्ये मोबाइल नंबर टाकताना स्क्रिन टचच्या समस्या येतात. तसंच, तिकीट बाहेर पडताना अडचणी येतात.
- किरण वेलणकर, प्रवासी
हेही वाचा-
मालाड स्कायवाॅक सोमवारपासून ११ दिवसांसाठी बंद
नेरळ ते माथेरान प्रवास आता थंडाथंडा-कूलकूल