पश्चिम रेल्वे (Western railway) प्रमाणं आता मध्य रेल्वेच्या (Central Railway) ट्रान्स हार्बर (Trans Harbour) मार्गावर एसी लोकल धावू लागली आहे. या एसी लोकलच्या (AC Local) माध्यमातून प्रवाशांना गारेगार प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, हा गारेगार प्रवास प्रवाशांना (passengers) परवडत नाही. कारण, या एसी लोकलचं तिकीट (Local Ticket) अव्वाच्या सव्वा असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते. प्रवाशांना ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावरील ठाणे ते वाशी/पनवेल (Thana to Vashi/Panvel) प्रवासासाठी १८५ रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळं एका वेळेच्या प्रवासासाठी प्रवाशांना २०० रुपयांची नोट मोडावी लागत असल्यानं ते नाराज आहेत.
ट्रान्स
हार्बर (Trans
Harbour)
मार्गावरील
ठाणे ते पनवेल एसी
लोकलचं भाडं १८५ रुपये आहे.
तर
याच मार्गावरील सामान्य लोकलचं
(Local)
द्वितीय
श्रेणीचं भाडं १५ रुपये
आहे.
प्रथम
श्रेणीचं भाडं १४५ रुपये आहे.
ठाणे
ते ऐरोलीचं वातानुकूलित लोकलचं
भाडं ७० रुपये असून सामान्य
लोकलचं भाडं केवळ ५ रुपये आहे.
त्यामुळं
प्रवाशांनी एसी लोकल सुरू
असली तरी सामान्य लोकलाच
प्राधान्य दिलं आहे.
हेही वाचा - राम मंदिर आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेबांना भारतरत्न द्या, ‘या’ नेत्याची मागणी
रेल्वेमंत्री
पियूष गोयल (Railway
Minister Piyush Goyal)
यांच्या
हस्ते ३० जानेवारी रोजी मोठ्या
थाटा-माटात
या लोकलचं लोकार्पण करण्यात
आलं होतं.
मात्र,
ही
लोकल प्रवाशांसाठी गैरसोयीची
ठरत आहे.
या
लोकलचं अव्वाच्या सव्वा भाडं,
त्या
तुलनेत सुविधांची कमतरता आणि
या लोकलच्या फेऱ्यांसाठी
सर्वसाधारण लोकलच्या फेऱ्यांतील
कपात या कारणांमुळे आठवडाभरातच
ट्रान्सहार्बरचंं प्रवासी
एसी लोकलबद्दल नाराजी व्यक्त
करत आहेत.
हेही वाचा - हार्बरवरील एसी लोकलचं तिकीट 'इतक्या' रुपयांचं
३१
जानेवारीपासून सुरू झालेल्या
या एसी लोकलसाठी सामान्य
लोकलच्या १६ फेऱ्या रद्द
करण्यात आल्या आहेत.
त्यातच
प्रवाशांची
संख्याही कमी आहे.
३१
जानेवारी पासून ही लोकल नियमीत
सुरू झाली परंतु,
त्या
दिवसापासून या लोकलमध्ये
सकाळच्या गर्दीच्या वेळेतील
८ ही फेऱ्यांमध्ये प्रत्येकी
५० प्रवासीही नव्हते.
लोकलचे
स्वयंचलित दरवाजांच्या (local
Door)
उघडझापमुळं
ही लोकल प्रत्येक स्थानकात
जास्त वेळ थांबवावी लागते.
त्यामुळं
या
विलंबाचा परिणाम सामान्य
लोकलच्या वेळापत्रकावर (Local
Timetable)
होत
आहे.
सामान्य
लोकलच्या फेऱ्या रद्द केल्यानं
प्रवाशांना मोठ्या त्रासाला
सामोरं जावं लागत आहे.
त्यात
भाडंही अधिक असून ते न परवडणारं आहे.
एसी
लोकलसाठी सामान्य लोकलच्या
फेऱ्या रद्द केल्यानं इतर
लोकल फेऱ्यांवर प्रवाशांचा
ताण येतो आहे.
प्रवाशांना
धक्काबुक्की सहन करावी लागते
आहे.
परिणामी
प्रवासी संख्या वाढत असल्यानं
अपघात होण्याची शक्यता
नाकारता येत नाही.
हेही वाचा - 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेवरील अफवांवर विश्वास ठेवू नका : डॉ. अमोल कोल्हे
मध्य रेल्वे मार्गावरील या पहिल्या एसी लोकलचं (ac local) सारथ्य महिला मोटरमनच्या (women motarman) हाती सोपवण्यात आलं आहे. सोमवार ते शुक्रवार अशी आठवड्यातून ५ दिवस ही एसी लोकल ट्रान्स हार्बर (trans harbour) मार्गावर धावते. मात्र, शनिवार आणि रविवार एसी लोकलची फेरी होणार नाही. या वेळेत साधी लोकल चालण्यात येते. एसी लोकलच्या दोन्ही दिशेने एकूण १६ फेऱ्या धावत आहेत. त्यानुसार पहिली फेरी पहाटे ५.४४ वाजता पनवेल-ठाणे मार्गावर, तर ठाणे-पनवेल मार्गावर रात्री ९.५४ ला शेवटची फेरी आहे.
हेही वाचा -
महिला अत्याचाराच्या घटनेचा तपास करताना हयगय नको, मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना
Video: माटुंगा स्थानकात विकृताने घेतलं विद्यार्थीनीचं चुंबन