गोवंडी - शेअर रिक्षाचालक कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. देवनार पोलीसही काही पैशांसाठी या रिक्षाचालकांचा साथ देत आहेत असा आरोप प्रवाशांकडून होत आहे. या संदर्भात शिवाजीनगर इथल्या वाहतूक पोलिसांना विचारले असता ते म्हणाले की, चालकांवर कारवाई केल्यास ते हल्ला करतात. तर देवनार पोलिसांचं म्हणणं आहे की, प्रवाशांनीही नियमाचं पालन करावं. पण मुंबई लाइव्हशी बोलताना प्रवासी मनोजने सांगितलं की जेव्हापर्यंत पाच जण रिक्षात बसत नाहीत तेव्हापर्यंत रिक्षाचालक थांबून राहतो, त्यामुळं पर्याय नसल्यानं रिक्षात बसावं लागतं.