Advertisement

शिवनेरीचा अटल सेतूवरून प्रवास

पुणे- मुंबई हे अंतर आणखी कमी वेळेत पार करता येणार आहे.

शिवनेरीचा अटल सेतूवरून प्रवास
SHARES

शिवडी ते नवाशेवा दरम्यान धावणारी शिवनेरी आता 'अटल सेतू' या मार्गाने जाणार आहे. पुणे ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर शिवनेरी या मार्गावरून जाणाऱ्या शिवनेरीला चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे या प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी शिवनेरी बस अटल सेतू येथून मुंबईला पोहोचणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई-पुणे शिवनेरी बसचा प्रवास त्याच तिकीट दरात जलद होणार आहे.

एसटी महामंडळाच्या वतीनं स्वारगेट- मंत्रालय - स्वारगेट अशी (Shivneri Bus) शिवनेरी बस सेवा नुकतीच सुरु करण्यात आली आहे. मंगळवारपासून सुरु झालेल्या या बस सेवेअंतर्गत सदरील प्रवास मार्गावर सोमवार ते शुक्रवार या दिवसांदरम्यान शिवनेरी धावणार असून, अटल सेतूमार्गे ती निर्धारित स्थळी पोहोचणार आहे.

काय आहेत तिकीटाचे दर? 

स्वारगेट- मंत्रालय- स्वारगेट शिवनेरीचं फुल तिकीट 565 रुपये, तर हाफ तिकीट 295 रुपये इतकं आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात 65 ते 75 टक्क्यांची सवलत असून, 75 वर्षांवरील नागरिकांना या प्रवासात 100 टक्के सवलत दिली जाणार आहे. 

प्रवासाच्या वेळेत बचत... 

मुंबई आणि नवी मुंबईमधील अंतर अवघ्या काही मिनिटांवर आणणाऱ्या या अटल सेतूमुळं पुण्यापर्यंतचं अंतरही एका अर्थी कमी झालं आहे. प्रवासी वाहनांसाठी अर्थात एसटी बससाठीही हा सेतू सुरू करण्यात आला आणि त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ज्यानंतर मंत्रालय आणि त्या परिसरात नोकरीसाठी असणाऱ्या अनेकांकडूनच अटल सेतूवरून स्वारगेट- मंत्रालय मार्गावरही बस सेवेची मागणी करण्यात आली. 

आता अटल सेतूवरून धावणारी शिवनेरी थेट मंत्रालय परिसरामध्ये पोहोचणार असल्यामुळं मंत्रालयासह या भागात असणाऱ्या कैक सरकारी कार्यालयांमध्ये नोकरीस रुजू असणाऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे. जिथं अडीच ते तीन तासात मुंबई गाठणं शक्य होत आहे.


हेही वाचा

कल्याण-कर्जत-कसारा रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचे 'नो टेंशन'

ठाणे : घोडबंदर रोडवरील 3 प्रमुख उड्डाणपूल तात्पुरते बंद राहणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा