Advertisement

प्रवाशांनो लक्ष द्या! ‘या’ वेळेत ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग बंद

प्रवाशांना काही काळ रात्री टिकीट बुक करण्याची सुविधेपासून मुकावे लागणार आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या! ‘या’ वेळेत ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग बंद
SHARES

१४ नोव्हेंबरपासून ते २१ नोव्हेंबरपर्यंत रात्री ऑनलाईन टिकीट बुक होणार नाही. रेल्वे आपल्या पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टमला अपग्रेड करत आहे. त्यामुळे प्रवाशांना काही काळ रात्री टिकीट बुक करण्याची सुविधेपासून मुकावे लागणार आहे.

नवीन रेल्वेंची संख्या आणि अन्य डेटाला अपग्रेड करण्यासाठी हा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. प्रवाशी रात्री ११.३० पासून पहाटे ५.३० वाजेपर्यंत ऑनलाईन प्रणालीनं टिकीट बुक करू शकणार नाही.

भारतीय रेल्वेनं दिलेल्या पत्रात सांगितलं आहे की, नवीन रेल्वे गाड्यांची संख्या आणि जुन्या गाड्यांची आसन क्षमता याला अपग्रेड करणाऱ्यासाठी काही काळ रात्रीची बुकिंग बंद करण्यात आली आहे.

रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, अपग्रेडची ही प्रक्रिया १४ नोव्हेंबरपासून २० ते २१ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे रात्री ११ वाजेपर्यंत पहाटे ५ वाजेपर्यंत PRS सिस्टीम बंद राहणार आहे. यात सहा तासातच्या दरम्यान टिकीट रिझर्वेशन, टिकीट रद्द आणि गाड्यांविषयीची माहिती अशा सर्व सेवा बंद राहणार आहे. मात्र १३९ या क्रमाकांवर प्रवाशी रेल्वेसंबंधी विचारपूस करू शकता.

कोरोनामुळे अनेक गाड्यांचे नाव बदलून स्पेशल रेल्वेगाड्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार टिकीटवाढही करण्यात आली होती. मात्र आता सिस्टीम अपग्रेड केल्यानंतर स्पेशल गाड्या आता पूर्वीच्या नावाप्रमाणेच सुरू केल्या जाणार आहेत. सोबतच टिकीटदर देखील जुनेच असणार आहेत.

रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की, कोरोना काळात स्पेशल रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र आता त्या रद्द करून सामान्य रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. त्यामुळे टिकीटदरात सुमारे ३० टक्के घट होणार आहे.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेवर लवकरच धावणार २० एसी लोकल ट्रेन

पश्चिम रेल्वेमार्गावरील 'या' स्थानकांची होणार दुरूस्ती

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा