Advertisement

एसटी कामगार पुन्हा जाणार संपावर?


एसटी कामगार पुन्हा जाणार संपावर?
SHARES

दिवाळीत एसटी कामगार संपावर गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल झाले होते. पगारवाढीच्या मुद्यावर कामगरांनी संपाचे शस्त्र उचलले होते. पण यंदा पुन्हा जानेवारीत एसटी कामगारांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्यामुळे मुंबईसह राज्यभरातील प्रवाशांचे हाल होणार आहेत.


उच्चस्तरीय समितीविरोधात अवमान याचिका

एसटी कामगारांच्या वेतनवाढ व इतर मागण्यांप्रकरणी एसटीचे महाव्यवस्थापक रणजीत सिंह देवल यांच्यासह पाच जणांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने उच्च न्यायालयात १५ नोव्हेंबरला याबाबतचा अंतरिम अहवाल सादर करणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी तो अहवालच सादर केला नाही. त्यामुळे कामगार संघटना त्यांच्याविरोधाच अवमान याचिका दाखल करण्याच्या विचारात आहेत.

राज्यातील एसटी कामगारांचे पगार हे खूप कमी असल्यामुळे कामगारांचे या महागाईत घर चालवणे कठीण झाले आहे. याबद्दल महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)चे सरचिटणीस मनोज तिगोठे यांच्याशी 'मुंबई लाईव्ह'ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की 'आमच्या कामगरांचे वेतन हे देशातील एसटी कर्मचा-यांपेक्षा आणि राज्यातील सरकारी कर्मचा-यांपेक्षा खूप कमी आहे. म्हणून १४ जानेवारीला आम्ही १ लाख १० हजार कर्मचाऱ्यांसोबत इतर एसटी कामगार संघटना संपावर जाणार आहोत.


अपेक्षित निर्णय, नाहीतर संप!

कामगारांच्या मागण्यांबद्दल उच्चस्तरीय समितीला उच्च न्यायालयात 22 डिसेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणे आवश्यक आहे. तसेच, 10 जानेवारीपर्यंत हे प्रकरण निकाली काढणं अपेक्षित आहे. मात्र, अपेक्षित तोडगा न निघाल्यास एसटी संघटना पुन्हा संपावर जाणार असल्याचे एसटी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.



हेही वाचा

संप पडला महागात, एसटी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापणार


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा