Advertisement

बेस्ट पासधारकांसाठी गूडन्यूज! ९ दिवसांची मिळणार भरपाई

८ जानेवारी ते १६ जानेवारीदरम्यान बेस्टच्या संपामुळे या पासधारकांना मोठा फटका बसला. नऊ दिवसांचा पास वाया गेल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत होती.

बेस्ट पासधारकांसाठी गूडन्यूज! ९ दिवसांची मिळणार भरपाई
SHARES

मुंबईत दररोज २५ लाखांहून अधिक प्रवाशी बेस्टने प्रवास करतात. त्यामुळे बेस्ट मुंबईची दुसरी लाईफलाईन मानली जाते. त्याचवेळेस बेस्टच्या पासच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. मात्र त्याचवेळी ८ जानेवारी ते १६ जानेवारीदरम्यान बेस्टच्या संपामुळे या पासधारकांना मोठा फटका बसला. नऊ दिवसांचा पास वाया गेल्यानं प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत होती. ही नाराजी लक्षात घेत अखेर बेस्टनं नऊ दिवसांची भरपाई मिळणार आहे. फक्त त्यासाठी पासधारकांना बस डेपोमध्ये जाऊन पास वैधता नऊ दिवसांसाठी वाढवून घ्यावी लागेल.


भरपाईचा मागणी

बेस्टचे कर्मचारी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले होते. तर हा संप एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल ९ दिवस सुरू राहिला. त्यामुळे ८ जानेवारी ते १६ जानेवारीदरम्यान पासधारकांना रिक्षा-टॅक्सी वा इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला, त्यांच्या खिशाला कात्री बसली. तर दुसरीकडे नऊ दिवस वाया गेले. त्यामुळे संप मिटल्याबरोबर पासधारकांकडून एकच सवाल केला गेला तो म्हणजे आमच्या नऊ दिवसांची भरपाई कोण करणार? त्यातूनच नऊ दिवस भरून देण्याची मागणी होऊ लागली.


पावती-शिक्का घ्या

या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने अखेर पासधारकांना दिलासा दिला आहे. नऊ दिवसांची भरपाई पासधारकांना देण्याचा निर्णय बेस्टनं घेतला आहे. त्यानुसार पासधारकांनी बस डेपोमध्ये जाऊन पासच्या पावतीवर वैधता कालावधी दर्शवणारा शिक्का मारून घ्यावा लागेल. पावती नसेल तर नवीन पावती बनवून त्यावर असा शिक्का घेता येईल. या पावतीनुसार पासधारकांना पासाची मुदत संपल्यानंतर पुढचे नऊ दिवस पासएेवजी ही पावती दाखवत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे पासधारकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. ९ दिवस बेहाल झाल्यानंतर पासाची मुदत संपल्यानंतरच्या ९ दिवसांसाठी आता पासधारकांना पैसे मोजावे लागणार नाहीत.



हेही वाचा -

शुक्रवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दोन तास बंद

आधी बिल घ्या, नंतर पैसे द्या, रेल्वेचं प्रवाशांना आवाहन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा