नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ई-बाईक चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत 11 दिवसांत 672 ई-बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.
तसेच घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या 180 दुचाकी वाहनांवर ई-चलान (echallan) कारवाई करण्यात आली. मुंबईत (mumbai) घरोघरी जाऊन अन्न वितरणाचे काम करणारे अनेक तरुण भरधाव वेगाने दुचाकी (two wheelers) चालवून नियम मोडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वेळेत जेवणाची अथवा इतरत्र ऑर्डर वेेळेत पोहोचवण्याच्या स्कीममुळे, जास्तीत जास्त ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अनेकदा अन्न वितरणाचे काम करणारे अथवा इतर डिलीव्हरी बॉय वाहतुकीचे नियम मोडतात.
तसेच सिग्नलचे पालन न करणे, हेल्मेट न वापरणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने दुचाकी चालवणे अशा उल्लंघनांबाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अलीकडे या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.
परिवहन विभागाने 18 ते 29 डिसेंबर या कालावधीत राबविलेल्या ई-बाईक (ebike) विरुद्धच्या विशेष मोहिमेअंतर्गत 181 गुन्हे नोंदवून 672 ई-बाईक जप्त करण्यात आल्या. तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत खाद्यपदार्थ वितरीत करणाऱ्या 180 दुचाकींवर ई-चलान कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ई-बाईक चालक आणि डिलिव्हरी बॉय यांची मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेच्या हेल्पलाइनवर तक्रार करावी.
हेही वाचा