Advertisement

दक्षिण भारतातील वैलंकनी उत्सवासाठी परेची विशेष ट्रेन


दक्षिण भारतातील वैलंकनी उत्सवासाठी परेची विशेष ट्रेन
SHARES

दक्षिण भारतातील वैलंकनी उत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे. पश्चिम रेल्वेकडून मुंबईवरुन दक्षिण भारतात जाण्यासाठी विशेष ट्रेन सुरु करण्यात आली आहे. वांद्रे टर्मिनस ते वैलंकनी या स्थानकादरम्यान विशेष भाडे शुल्कासह ही ट्रेन चालवण्यात येणार आहे.

या गाडीचं आरक्षण रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर २१ जुलैपासून करता येईल. या ट्रेनमधे वातानुकूलीत द्वितीय श्रेणी, वातानुकूलीत तृतीय श्रेणी, शयनयान आणि सामान्य श्रेणी डबे असतील.


वांद्रे टर्मिनस - वैलंकनी विशेष ट्रेन

गाडी क्र.              -     ०९०४१
कधी धावणार        -     सोमवार २७ ऑगस्ट २०१८
किती वाजता         -     रात्री १०.५० वाजता
कधी पोहचणार       -     बुधवारी दुपारी १.२० वाजता


वैलंकनी - वांद्रे टर्मिनस

गाडी क्र.             -      ०९०४२
कधी धावणार       -      बुधवार २९ ऑगस्ट २०१८
कीती वाजता        -      रात्री ९.४५ वाजता
कधी पोहचणार     -      शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता



हेही वाचा -

परळ टर्मिनसला कर्मचारी संघटनांचा विरोध

मेट्रो-३ चं 'मेक इन इंडिया', मेट्रोचे डबे बनणार भारतात




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा