Advertisement

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची प्रकृती बिघडली

सुशांतच्या मृत्यूनं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची प्रकृती बिघडली
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी मुंबईमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनं कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच वडील केके सिंह बेशुद्ध झाले. घरातील लोक त्यांना आधार देत आहेत.

सुशांत सिंह मूळ बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील होता. ९० च्या दशकात त्यांचे संपूर्ण कुटुंब पाटण्यात स्थायिक झाले होते. सुशांतचे वडील केके सिंह सरकारी अधिकारी होते. सुशांतचे प्राथमिक शिक्षण पटनाच्या सेंट कैरेंस स्कूलमधून झाले. त्यानंतर तो दिल्लीला गेला.

दरम्यान, सोमवारी मुंबईत त्याच्या पार्थिवावर अंत्य संस्कार केले जाणार आहेत. त्याचे कुटुंब रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी मुंबईत दाखल होईल. पण सध्या सुशांतच्या वडिलांना याचा जास्तच धक्का बसला आहे. सुशांतचे इतर नातेवाईक त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत.  

क्राइम ब्रँचची टीम सुशांतच्या घरी पोहचली आहे. डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले की, घरात काहीच संशयास्पद आढळले नाही. पण सुशांतच्या मामानं न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे सुशांत एका बंगाली तरुणीमुळे त्रस्त होता. पण नेमकं कारण काय? हे कोणालाच माहित नाही.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, सुशांत सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता आणि औषध घेत होता. ज्यावेळेस त्याने आत्महत्या केली, त्यावेळेस सुशांतचे मित्रही घरात होते. सध्या पोलिस त्यांची चौकशी करत आहे.



हेही वाचा

सुशांतनं आत्महत्येपूर्वी 'या' अभिनेत्याला केला होता फोन, पण...

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर पोलिस काय म्हणाले?

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा